09 जानेवारी: गोल्डन ग्लोब सोहळ्यात अभिनेत्री मेरील स्ट्रिपला उल्लेखनीय कारकिर्दीबद्दल गौरवण्यात आलं. यावेळी भाषण करताना या अभिनेत्रीने अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. ट्रम्प यांनी आक्रमक प्रचारमोहिमेद्वारे मतदारांवर स्वत:ची प्रतिमा ठसवली, असा आरोप मेरील स्ट्रिप हिने केला. डॉनल्ड ट्रम्प यांनी न्यूयॉर्क टाइम्सच्या एका रिपोर्टरची नक्कल केल्याबद्दलही तिने ट्रम्प यांच्यावर टीका केली.
मेरील स्ट्रिप हिच्या या पावित्र्याने गोल्डन ग्लोब सोहळ्याला उपस्थित असलेले हॉलिवूडमधले दिग्गजही स्तब्ध झाले. न्यूयॉर्क टाइम्सचे रिपोर्टर सर्ज कोवालेस्की हे शारिरीकदृष्ट्या अपंग आहेत. नोव्हेंबर 2015 मध्ये घेतलेल्या एका प्रचारसभेत डॉनल्ड ट्रम्प यांनी त्यांची नक्कल करत त्यांची थट्टा उडवली होती. ट्रम्प यांच्या या कृत्याचा मेरिल स्ट्रिप हिने निषेध केला. डॉनल्ड ट्रम्प यांनी मात्र अशी नक्कल केल्याचा वारंवार इन्कार केलाय.
मेरिल स्ट्रिप हिच्या भाषणानंतर न्यूयॉर्क टाइम्सने डॉनल्ड ट्रम्प यांना त्यांची प्रतिक्रिया विचारली. यावर, ट्रम्प यांनी हॉलिवूड अभिनेत्यांचा उल्लेख 'उदारमतवादी चित्रपट कलाकार' असा केला. मेरिल स्ट्रिप हिच्या वक्तव्याचं मला अजिबात आश्चर्य वाटत नाही कारण मेरिल स्ट्रिप हिने अमेरिकन निवडणुकीत हिलरी क्लिंटन यांना पाठिंबा दिला होता, असं डॉनल्ड ट्रम्प म्हणाले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा