नगरपरिषदा निवडणुकीत भाजपच नंबर वन, काँग्रेस दुसऱ्या स्थानावर

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jan 9, 2017 06:33 PM IST

cm_fadanvis_nagarpalika09 जानेवारी :   नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकीच्या आखाड्यात भाजपने घवघवीत यश मिळवलं असून सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपचेच निवडून आले आहेत. आज झालेल्या चौथ्या टप्प्यातही भाजपचीच सरशी झालीये. अकरापैकी सात नगरपालिकांमध्ये भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले आहे. तर काँग्रेसचा अवघा एक नगराध्यक्ष निवडून आलाय. तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेला भोपळाही फोडता आला नाही. नगरपरिषदाच्या आखाड्यात भाजप नंबर वन पक्ष ठरलाय तर काँग्रेस दुसऱ्या स्थानावर आहे. शिवसेना तिसऱ्या आणि राष्ट्रवादी चौथ्या स्थानावर फेकला गेलाय.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिनी विधानसभा म्हणून पाहिल्या जाणाऱ्या नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारली. पहिल्या, तिसऱ्या आणि आज चौथ्या टप्प्यातही भाजपने विजयी घोडदौड कायम ठेवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगराध्यक्षपदाची खेळी खेळली. मुख्यमंत्र्यांची ही खेळी पूर्णपणे यशस्वी ठरलीये. आज चौथ्या टप्प्यातही भाजपने 11 जागांपैकी 7 जागा पटकावल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी आपला गड कायम राखला आहे.

याआधीही पहिल्या टप्प्यात 22 ठिकाणी भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले. त्यानंतर दुसरा टप्पा वगळला तिसरा आणि चौथ्या टप्प्यात भाजपचे सर्वाधिक नगराध्यक्ष निवडून आले. दुसऱ्या टप्प्यात पुणे आणि बारामतीमध्ये राष्ट्रवादीने आपला गड राखला होता. 191 जागांपैकी 72 ठिकाणी भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले आहे. काँग्रेसने दुसऱ्या स्थानी झेप घेतली असून 35 जागा पटकावल्या आहे. तर शिवसेनेनं 25 आणि राष्ट्रवादी काँग्रेसने 24 जागा  जिंकल्या आहेत. तर अपक्षांनी 35 जागांवर कब्जा केलाय.

रामटेकमध्ये सेनेला धक्का, भाजपची सत्ता

शिवसेनेला मात्र अपयश आल्याचं चित्र दिसतंय. रामटेक नगरपालिकेतील शिवसेनेच्या सत्तेला भाजपाने सुरुंग लावत विजय मिळवला आहे. यासाठी भाजप आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी रामटेकमध्ये आपला डेरा जमवला होता. पक्षात झालेल्या बंडखोरीचा शिवसेनेला विदर्भात मोठा फटका बसण्याची चिन्हं दिसतं आहेत. रामटेक पालिकेतील 17 जागांपैकी भाजपाने 13 जागांवर विजय मिळवला आहे. तर शिवसेना आणि काँग्रेसला प्रत्येकी २ जागांवर समाधान मानावे लागलंय. रामटेकचे नगराध्यक्षपदी भाजपाचे दिलीप देशमुख विजयी झाले आहे. काटोलमध्ये विदर्भ माझा पक्षाने 8 जागी विजय मिळवलाय.

Loading...

विशेष म्हणजे, विधानसभा निवडणुकीपूर्वी वेगळ्या विदर्भाचं भाजपच्या नेत्यांनी आश्वासनं दिलं. मात्र, सत्तेत आल्यानंतर भाजपची भूमिका मवाळ झाली होती. त्यामुळे विदर्भवादी कुणाच्या बाजूने राहतील हे पाहण्याचं ठरणार होतं. पण, नगरपरिषदा आणि नगरपालिकांच्या निवडणुकीत भाजप जनमत चाचणी पास झाल्याचं चित्र आहे.

नगरपरिषद निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचा निकाल

सावनेर - एकूण जागा - 20

भाजप - 14

काँग्रेस - 06

नगराध्यक्ष - रेखा मोवाडे, भाजप

--------------------------------------------------------------

उमरेड - एकूण जागा - 25

भाजप - 19

काँग्रेस - 6

नगराध्यक्ष - विजयलक्ष्मी भदोरिया, भाजप

--------------------------------------------------------------

काटोल - एकूण जागा - 23

विदर्भ माझा - 18

शेकाप - 4

भाजप - 1

काँग्रेस - 0

राष्ट्रवादी - 0

नगराध्यक्ष - वैशाली ठाकूर, विदर्भ माझा

--------------------------------------------------------------

नरखेड - एकूण जागा - 17

राष्ट्रवादी - 8

नगरविकास आघाडी - 5

शिवसेना - 3

अपक्ष -1

नगराध्यक्ष - अभिजीत गुप्ता (नगरविकास आघाडीचे )

--------------------------------------------------------------

खापा नगरपरिषद - एकूण जागा - 17

भाजप - 15

काँग्रेस - 1

अपक्ष - 1

नगराध्यक्ष - प्रियंका मोहिते ( भाजप )

--------------------------------------------------------------

मोहपा - एकूण जागा - 17

काँग्रेस - 10

भाजप 5

शिवसेना 2

नगराध्यक्ष - शोभा काऊटकर (काँग्रेस)

--------------------------------------------------------------

कळमेश्वर - एकूण जागा 17

भाजप 5

शिवसेना 2

कॉंग्रेस 8

एनसीपी 2

नगराध्यक्ष - स्मृति इखार

--------------------------------------------------------------

रामटेक - एकूण जागा 17

भाजप 13

शिवसेना 2

कॉंग्रेस 2

नगराध्यक्ष दिलीप देशमुख ( भाजप )

--------------------------------------------------------------

कामठी - एकूण जागा - 32

काँग्रेस - 15

भाजप - 05

शिवसेना - 1

बसपा -1

MIM -1

अपक्ष - 3

नगराध्यक्ष - शहाजया शफाहद (काँग्रेस)

--------------------------------------------------------------

तिरोडा नगरपरिषद - एकूण जागा 17

राष्ट्रवादी - 9

भाजप - 5

शिवसेना 2

अपक्ष - 1

नगराध्यक्ष - सोनाली देशपांडे (भाजपा)

--------------------------------------------------------------

नागपूर जिल्हानिहाय कोणाला कुठे बहुमत?

भाजप - रामटेक, उमरेड, सावनेर, खापा,

काँग्रेस - कळमेश्वर (राष्ट्रवादीसह ), मोहपा

राष्ट्रवादी - नरखेड (काठावरचे बहुमत)

विदर्भ माझा - काटोल

--------------------------------------------------------------

नगराध्यक्ष

भाजप - रामटेक, कळमेश्वर, सावनेर, खापा, उमरेड

काँग्रेस - मोहपा

नगरविकास आघाडी - नरखेड

--------------------------------------------------------------

नगराध्यक्ष कुणाचा ?

एकूण जागा 191

भाजप -72

काँग्रेस - 35

शिवसेना - 25

राष्ट्रवादी -24

अपक्ष - 35

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 9, 2017 06:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...