हॅपी बर्थडे फरहान अख्तर

हॅपी बर्थडे फरहान अख्तर

  • Share this:

unnamed09 जानेवारी: आज फरहान अख्तरचा ४२वा वाढदिवस. बॉलिवूडमध्ये त्याने एक दिग्दर्शक , निर्माता , गायक आणि अभिनेता म्हणून स्वत:ची खास जागा बनवलीय. 'भाग मिल्खा भाग' या त्याच्या चित्रपटासाठी तर त्याने विशेष मेहनत घेतली आणि तो चित्रपट सर्वांचे कौतुक मिळवून गेला.

२०१६ हे वर्ष त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यासाठी खूप वेगळं ठरलं. यावर्षी हेअरस्टाईलिस्ट अधुना भावनीसोबतचा त्याचा १६ वर्षाचा संसार तुटला. फरहानच्या घटस्फोटाचं कारण श्रध्दा कपूर आहे की आदिती राव हैदरी हा प्रश्न फिल्म इंडस्ट्रीला पडलाय. मध्यतंरी श्रध्दा आपल्या वडिलांचं घर सोडून त्याच्या घरी लिव ईन रिलेशनशीपमध्ये राहत असल्याचीसुध्दा बातमी आलेली. आदिती राव हैदरी त्याच्यासोबत 'वझीर' या चित्रपटात दिसली होती. असो.

रॉक ऑन , रॉक ऑन २, जिंदगी ना मिलेगी दोबारा आणि भाग मिल्खा भाग या चित्रपटातून त्याने त्याचं कमालीचं अभिनय कौशल्य दाखवलंय. त्याच्या चित्रपटांचे विषय थोडे हटके असतात आणि त्याचं सादरीकरण टीकाकारांचं कौतुक घेऊन जातात. तर या बॉलिवूडमधील या अष्टपैलू व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 9, 2017 12:00 PM IST

ताज्या बातम्या