एसआरएची घरं घेणाऱ्यांना दिलासा

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Jan 9, 2017 03:25 PM IST

MHADA121

प्रफुल्ल साळूंखे, मुंबई

09 जानेवारी : मुंबईत एसआरएची घरं विकत घेणाऱ्यांना थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण आज कॅबीनेटच्या बैठकीत या विषयावर तोडगा काढण्यासाठी मंत्रीमंडळाची उपसमिती नेमण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे डोक्यावर सतत टांगती तलवार असणाऱ्यांचा जीव भांड्यात पडण्याची शक्यता आहे.

एसआरए अंतर्गत मिळालेली घरं ही 10 वर्ष विकता येत नाही. पण तरी मुंबईत घरांचा प्रश्न इतका जटील आहे की लोकं कायद्याला बगल देत एसआरएची घरं विकत घेतात. मुंबईभर अशी 64 हजार घरं लोकांनी विकत घेतली आहे. कायद्याचं उल्लघन केल्यामुळे वर्षभरापूर्वी अशा गाळे धारकांना घुसखोर ठरवून नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. तेंव्हापासून हा विषय खुपचं गंभीर बनला होता. शिवाय वेगवेगळ्या ट्रान्झीट कँम्पमध्ये मोठ्या प्रमाणावर घुसखोर आहेत. त्यांच्या पुर्नवसनाचा प्रश्न होता. या सर्वच विषयावर आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक उपसमिती नेमून हा प्रश्न मार्गी लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यासाठी शासनानं काही पर्याय सुचवलेले आहेत. ज्यावर आता विचार करण्यात येईल.

Loading...

-ज्यांनी घरं विकत घेतली आहेत, त्यांनी शासनाला ट्रान्सफर फी भरुन ही घरं नियमीत करुन घ्यावी

- घुसखोरांना सुद्धा प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत फीभरुन नियमीत केले जाईल

-ट्रान्झीट कँम्पमध्ये रहाणाऱ्यांना, आत्ता रहात असलेल्या किंवा जुन्या जागेचा पर्याय दिला जाईल.

मुंबईत म्हाडा, एसआरए, एमएमआरडीए अशा विविध यंत्रणा घरांची निर्मिती करत असते. त्यामुळे नियमांबाबत मोठा गोंधळ निर्माण झाला असून या सर्वच यंत्रणासाठी एकच गृहनिर्माण धोरण असणं गरजेचं आहे. राज्य शासन या दृष्टीनं प्रयत्नशील असून, सर्वच अडचणींवर तोडगा काढून सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न असल्याचं शासनाचं म्हणणं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 9, 2017 02:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...