महापालिका निवडणुकांची आज घोषणा होण्याची शक्यता

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Jan 9, 2017 12:37 PM IST

bmc

09 जानेवारी : मुंबईसह राज्यातील दहा निवडणुकींची आज घोषणा होण्याची शक्यता आहे. आज सायंकाळी 4 च्या सुमारास पत्रकार परिषद होणार आहे. त्यामुळे आता राज्यात कोणत्याही क्षणी निवडणूक आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे.

निवडणूक आचारसंहिता कधीही लागू होणार असल्याने दर बुधवारी होणारी राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठकही आज बोलविण्यात आली आहे. या बैठकीत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही महत्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्याता आहे.

राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जे.एस.सहारिया यांनी कालच नागपूरमध्ये दहा महापालिकांच्या निवडणुका फेब्रुवारीतच होणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. जिल्हा परिषद आणि महापालिकांच्या निवडणुका मुदत संपण्यापूर्वी घेणं आवश्यक आहे. मात्र मार्च महिन्यात दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा असल्यानं निवडणुका फेब्रुवारीत घेण्यात येणार असल्याचं सहारिया यांनी स्पष्ट केलं आहे.

त्यापार्श्वभूमीवर निवडणूक आयोग कोणत्याही क्षणी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक कार्यक्रम घोषित करण्याची शक्यता असून त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच तातडीची मंत्रिमंडळाची बैठक बोलावली असल्यानं निवडणुकीची आचारसंहिता केंव्हाही लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Loading...

या महापालिकांसाठी होणार निवडणुका

 • मुंबई
 • ठाणे
 • उल्हासनगर
 • पुणे
 • पिंपरी-चिंचवड
 • नाशिक
 • सोलापूर
 • नागपूर
 • अकोला
 • अमरावती
 • चंद्रपूर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 9, 2017 12:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...