रामटेकमध्ये सेनेला धक्का, भाजपची एकहाती सत्ता

  • Share this:

sena_bjp3

09 जानेवारी :नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या चौथ्या आणि अंतिम टप्प्यातील श्रीहरे अणेंच्या विदर्भ राज्य आघाडीने दणक्यात सुरुवात केली असून 8 जागा पटकावल्या आहेत. शिवसेनेला मात्र अपयश आल्याचे चित्र दिसतंय. भाजपने मात्र, विदर्भात आपला गड कायम राखण्यात यश मिळवलंय.

रामटेक नगरपालिकेतील शिवसेनेच्या सत्तेला भाजपाने सुरुंग लावत विजय मिळवला आहे. भाजप आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी रामटेकमध्ये आपला डेरा जमवला होता.पक्षात झालेल्या बंडखोरीचा शिवसेनेला विदर्भात मोठा फटका बसण्याची चिन्हं दिसतं आहेत. रामटेक पालिकेतील 17 जागांपैकी भाजपने 13 जागांवर विजय मिळवला आहे. तर शिवसेना आणि काँग्रेसला प्रत्येकी २ जागांवर समाधान मानावे लागले आहे. रामटेकचे नगराध्यक्षपदी भाजपचे दिलीप देशमुख विजयी झाले आहेत. तर काटोलमध्ये विदर्भ राज्य आघाडीने 8 जागी विजय मिळवलाय. विदर्भ माझा पक्षाला या पालिकेत खातंही उघडला आलं नाही.चौथ्या टप्प्यातही भाजप आघाडीवर असल्याचं दिसून येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 9, 2017 01:12 PM IST

ताज्या बातम्या