S M L

उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद,निकालाची उत्सुकता

Sonali Deshpande | Updated On: Jan 9, 2017 08:59 AM IST

उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद,निकालाची उत्सुकता

08 जानेवारी : नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यातल्या अकरा नगरपरिषदांसाठीचं मतदान संपलंय. नगरपरिषद निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात सरासरी 67.36 टक्क्यांच्या आसपास मतदान झालंय. चौथ्या टप्प्यातल्या मतदानात 1 हजार 190 उमेदवारांचं आणि 92 नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद झालंय.उद्या 11 नगरपरिषदांचं भवितव्य ठरणार आहे.

नागपूर जिल्ह्यातल्या खापा, काटोल, कळमेश्वर, रामटेक या नगरपरिषदांसाठी मतदान झालं. तीन टप्प्यात भाजपला मोठं यश मिळालं. चौथ्या टप्प्यात तोही मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात काय निकाल लागतात याची सर्वांनाच उत्सुकता आहे.काटोलमधील भाजप आणि विदर्भ पक्षाच्या चरणसिंग ठाकुरांमध्ये झालेला राडा वगळता मतदान शांततेत पार पडलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 8, 2017 07:50 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close