संतापजनक! पोस्टमॉर्टम रुममधून मृत महिलेच्या अंगावरून सोने चोरीला

संतापजनक! पोस्टमॉर्टम रुममधून मृत महिलेच्या अंगावरून सोने चोरीला

बीड शहरातील पंचशिल नगरमध्ये राहणार्‍या निकिता गणेश शिंदे या विवाहितेने गळफास घेवून आत्महत्या केली होती.

  • Share this:

सुरेश जाधव, प्रतिनिधी

बीड, 16 डिसेंबर :  माणुसकी मेली.? असा प्रश्न निर्माण यासाठीच विचारला जातोय की, बीड जिल्हा रुग्णालयातील पोस्टमॉर्टम रुममधून मयत महिलेच्या अंगावरील सोने लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार आज समोर आला आहे.  या प्रकरणाची मयत महिलेच्या नातेवाईकांनी थेट  पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

बीड शहरातील पंचशिल नगरमध्ये राहणार्‍या निकिता गणेश शिंदे या विवाहितेने गळफास घेवून आत्महत्या केली होती. तिचा मृतदेह शवविच्छदनासाठी पोस्टमॉर्टम रुममध्ये ठेवण्यात आला होता. यावेळी मयत महिलेच्या गळ्यात आणि कानात सोन्याचे दागिने होते.  मयत महिलेचा पंचनामा करण्यासाठी पोलीस पोस्टमॉर्टम रुममध्ये गेले असता. महिलेच्या काणातील सोन्याचे फूल गायब असल्याचं नातेवाईकांच्या निदर्शनास आले. त्यानंतर नातेवाईकांनी या प्रकरणानंतर संताप व्यक्त केला आहे.

या बाबत अज्ञान चोरट्याविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात यावा आणि चोराला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी वंचितचे प्रदेश प्रवक्ते शिवराज बांगर यानी केली आहे.

जिल्हारुग्णालयातील पोस्टमॉर्टम रुमला लॉक आहे. प्रत्येक वेळी मृतदेह बाहेर काढताना आणि आत ठेवल्यानंतर रुम लॉक केली जाते. त्यामुळे येथे चोरी करण्यासाठी खाजगी इसम कसा आला? त्याला रुमची चावी मिळालीच कशी. असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. या बाबतीत जिल्हा रूग्णालय प्रशासनाला विचारल असता. कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला. यात कर्मचारी दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन जिल्हा शल्यचिकित्सक अशोक थोरात यांनी दिलं.

First published: December 16, 2019, 9:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading