S M L

राणीबागेत पेंग्विन दर्शन दोन महिने मोफत राहणार - महापौर

Samruddha Bhambure | Updated On: Jan 7, 2017 08:17 PM IST

राणीबागेत पेंग्विन दर्शन दोन महिने मोफत राहणार - महापौर

07 जानेवारी  : मुंबईत राणीच्या बागेत पेंग्विन दर्शन एप्रिलपर्यंत मोफत राहणार आहे, अशी माहिती महापौर स्नेहल आंबेकर यांनी दिलीये. प्रौढांसोबत जर लहान मुंले असतील तर पेंग्विन दर्शन मोफत असेल, अशी माहितीही त्यांनी दिलीये. तर राणीच्या बागेतलं प्रवेशशुल्क पुढचे 2 महिने तरी जुन्याच दरानं राहणार आहेत. जोपर्यंत नवीन माहिती मिळत नाही, तोपर्यंत हे दर जुनेच असणार आहेत. एक एप्रिलनंतर नव्या दराची माहिती घेऊन मग नवे दर लागू होतील, असं त्या म्हणाल्यात.

मुंबईत राणीच्या बागेत पेंग्विन दर्शन एप्रिलपर्यंत मोफत राहणार आहे, अशी माहिती महापौर स्नेहल आंबेकर यांनी दिली आहे. प्रौढांसोबत जर लहान मुंले असतील तर पेंग्विन दर्शन मोफत असेल, अशी माहितीही त्यांनी दिली आहे. तर राणीच्या बागेतलं प्रवेशशुल्क पुढचे 2 महिने तरी जुन्याच दरानं राहणार आहेत. जोपर्यंत नवीन माहिती मिळत नाही, तोपर्यंत हे जुनेच दर असणार आहेत. एक एप्रिलनंतर याबाबतचा आढावा घेऊन नवे दर लागू करायचे की नाही याचा निर्णय घेण्यात येणार आहे, असं त्या म्हणाल्यात.


भायखळा इथल्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय म्हणजेच राणीच्या बागेतील प्रवेश शुल्क दहा पटीने वाढवण्यात येत आहे. विशेष म्हणजे पेंग्विन पाहण्यासाठी पालकांना 100 रुपये आणि 12  वर्षांखालील मुलांना 50 रुपये मोजावे लागणार आहेत. राणीबागेतील प्रवेश शुल्क याआधी 2003 मध्ये वाढवण्यात आले होते. त्यानुसार सध्या प्रौढांना 5 रुपये तर 12 वर्षाखालील मुलांना 2 रुपये एवढे शुल्क आकारण्यात येत आहे. त्यामधे आता या प्रवेश शुल्कात वाढ करण्याचे प्रशासनाने सुचवलं आहे. राणीबागेचा विकास 2012 सालापासून पासून सुरू आहे.

दक्षिण कोरियातून काही महिन्यांपूर्वी या राणीबागेत 8 हंबोल्ट पेंग्विन  आणण्यात आले. त्यापैकी एकाचा सुमारे दोन महिन्यांपूर्वी संसर्गाने मृत्यू झाला. सध्या राणीच्या बागेत 7 पेंग्विन्स आहेत. त्यांच्यासाठी पिंजरा बनवण्याचं काम सुरू आहे. त्याचं उद्घाटन होऊन मग ते पाहण्यासाठी खुले होणार आहेत. पुढचे दोन महिने तरी हे पेंद्विन दर्शन मुंबईकरांना मोफत असणार आहे.

महापालिका मुंबईकरांच्या कराचे २४ कोटी रुपये खर्च करत असताना पेंग्विन पाहण्यासाठी मुंबईकरांनी वेगळे पैसे का द्यावे असा सवाल काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे. पेंग्विन प्रकरणात घोटाळा झाल्याचा आरोपही राणे यांनी केला आहे. तर, मुंबईकरांना कमीत कमी शुल्कात पेंग्विन दर्शन होईल तर विद्यार्थ्यांना मोफत पेंग्विन दाखविण्यात यावेत असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. पेंग्विनबाबत कोणत्याही प्रकारची घाई करण्यात आली नसून वेळापत्रकानुसार कामे होत असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Loading...
Loading...
Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 7, 2017 08:17 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close