नाशिकमध्ये तब्बल 800 दुकाने जमीनदोस्त

नाशिकमध्ये तब्बल 800 दुकाने जमीनदोस्त

  • Share this:

nashik atikraman231

07 जानेवारी : नाशिक महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने आज (शनिवारी) शहरातील बेकायदा बांधकामांवर हातोडा चालवला. या कारवाईमध्ये तब्बल 800 हून अधिक दुकाने, कारखाने जमीनदोस्त करण्यात आली. महापालिका इतिहासातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचं सांगितलं जात आहे.

गेल्या 17 वर्षांपासून शहरातील 100 एकरावरील बेकायदा दुकाने आणि कारखान्यांना खाली करण्याचे आदेश महापालिकेकडून देण्यात आलं होतं. यासाठी महापालिकेकडून वेळोवेळी मुदत वाढ दिली गेली. मात्र, या आदेशानंतरही या परिसरातील बेकायदा दुकाने, कारखाने हटवण्यात आली नाहीत. त्यामुळे आज अखेर महापालिकेने या बेकायदा बांधकामांवर कारवाई केली.

या कारवाईसाठी प्रशासनाकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. या कारवाईसाठी 100 जेसीबी, पोकलेनची मदत घेण्यात आली. यासाठी सुमारे एक हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला. तसंच या कारवाईचे ड्रोनच्या माध्यमातून चित्रिकरणही करण्यात आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 7, 2017 06:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading