S M L

निकृष्ट दर्जाच्या टॅब्सवरून हायकोर्टाने मुंबई महानगरपालिकेला फटकारलं

Samruddha Bhambure | Updated On: Jan 6, 2017 10:26 PM IST

निकृष्ट दर्जाच्या टॅब्सवरून हायकोर्टाने मुंबई महानगरपालिकेला फटकारलं

06 जानेवारी :  मुंबई महापालिकेनं मनपा शाळांमध्ये वाटलेल्या टॅबच्या मुद्यावपरुन मुंबई हायकोर्टानं चांगलंच खडसावलं आहे.  शाळेत दिले जाणारे टॅब निकृष्ट दर्जाचे असून बहुतांश टॅंब खराब असल्याची जनहित याचिका पृथ्वीराज म्हस्के यांनी केली आहे.

मनपानं मात्र, वाटलेल्या टॅबपैकी फक्त ५ % टॅब्स नीट चालत नसल्याच्या तक्रारी आल्या असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेने कोर्टाला दिली होती. ही माहिती वाचून संतापलेल्या कोर्टाने आता आम्हीच जाहीर नोटीस काढून ज्या विद्यार्थ्यांचे टॅंब खराब झाले आहेत, त्यांनी सरळ कोर्टाकडे माहिती द्यावी असं सांगू, अशा शब्दात बीएमसीला फटकारलं आहे. त्याचबरोबर, हे असंच चालत राहिलं तर एखाद्या समितीला सांगून आम्हाला माहिती घ्यावी लागेल असंही कोर्टाने म्हटलं आहे.


२०१५-१६ या शैक्षणिक वर्षात २२हजार ७९९ टॅब वाटले गेलेत पण त्यापैकी १० हजार खराब झाले आहेत. तर २०१६-१७ या वर्षासाठी आतापर्यंत १५ हजार टॅब वाटले गेलेत. पण त्यातही अनेक टॅब नादुरुस्त आहेत अशी माहिती म्हस्के यांनी कोर्टाला दिली. याचिकाकर्त्यांनी नेमकी कोणत्या शाळांमध्ये जाऊन मिळवली याची यादी सादर करावी असा आदेशही याचिकाकर्त्यांला कोर्टाने दिलेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 6, 2017 10:26 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close