भारतीय क्रिकेट संघाची आज निवड

भारतीय क्रिकेट संघाची आज निवड

  • Share this:

cricket

06 जानेवारी : इंग्लंडविरुद्धच्या 3 वन डे आणि 3 ट्वेन्टी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघांची निवड आज मुंबईत होणार आहे.याच बैठकीत भारताचा वन डे आणि ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांसाठीचा कर्णधार म्हणून विराट कोहलीच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.तर निवड समितीची महेंद्रसिंग धोणीची ही शेवटची बैठक आहे.

दिल्लीचा डावखुरा सलामीवीर शिखर धवन तंदुरुस्त असल्यास संघात पुनरागमनाची संधी मिळू शकते. रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे हे अनुभवी फलंदाज अजूनही दुखापतीतून सावरलेले नाहीत. त्यामुळं लोकेश राहुलच्या साथीनं शिखर धवनला सलामीला खेळण्यासाठी भारतीय संघात संधी मिळू शकते.

अजिंक्य रहाणेच्या अनुपस्थितीत करुण नायरलाही संघात हक्काचं स्थान मिळू शकतं.करुण नायरनं इंग्लंडविरुद्धच्या चेन्नई कसोटीत त्रिशतक झळकावल्यानं, भारतीय संघाच्या निवडीत त्याचं नाव आघाडीवर आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: January 6, 2017, 12:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading