अलविदा ओम पुरी,दिग्गजांनी व्यक्त केली हळहळ

अलविदा ओम पुरी,दिग्गजांनी व्यक्त केली हळहळ

  • Share this:

 

ompuri cnn

06 जानेवारी : ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांच्या निधनावर अनेक दिग्गजांनी शोक व्यक्त केलाय. त्यांनी ट्विटरद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्यात. पाहुयात यापैकी काही ट्विट्स-

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनेते ओम पुरी यांच्या निधनामुळे शोक व्यक्त केलाय. ते म्हणतात, 'त्यांच्या सिनेमा आणि नाटकांमुळे ते कायम स्मरणात राहतील.'

आमिर खान यानंही आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय,'अतिशय वाईट घटना. आपण भारतीय सिनेमाच्या एका मोठ्या अभिनेत्याला गमावलं. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.'

सचिन तेंडुलकरनेही ओम पुरींच्या निधनावर शोक व्यक्त केलाय. तो म्हणाला , ' तुम्ही तुमच्या अष्टपैलू अभिनयामुळे कायम आमच्या स्मरणात राहाल. तुमच्या आत्म्याला शांती लाभो.'

निर्माते-दिग्दर्शक महेश भट्ट आपल्या ट्विटमध्ये म्हणालेत की, 'अलविदा ओम! माझे काही क्षण तुमच्यासोबत आज गेले आहेत. सिनेमाविषयी आणि आयुष्याविषयीच्या गप्पांच्या त्या रात्री मी कसं काय विसरू शकेन ? '

अनुपम खेर हेसुध्दा आपल्या ट्विटमध्ये म्हणालेत , 'शांतपणे बेडवर पडलेल्या अवस्थेत पाहिल्यानंतर विश्वास बसत नाही की एवढा मोठा अभिनेता आपल्यात नाही. दुःखदायक आणि धक्कादायक '

अनिल कपूरनेही ट्विट केलंय,' एक अभिनेता , एक गुरु,एक मित्र आणि एक महान व्यक्ती. कलेविषयी भरपूर आवड आणि स्वच्छ मनाचे . आम्ही तुम्हाला स्मरणात ठेवू.'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: January 6, 2017, 12:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading