S M L

अबु आझमींचं अक्षयकुमारला शिवराळ भाषेत उत्तर

Samruddha Bhambure | Updated On: Jan 5, 2017 09:06 PM IST

अबु आझमींचं अक्षयकुमारला शिवराळ भाषेत उत्तर

05 जानेवारी : बंगळुरूच्या छेडछाडीच्या मुद्यावर अक्षय कुमार आणि अबु आझमी यांच्यात चांगलीच जुंपलीय. महिलांनी तोकडे कपडे घातल्यामुळेच छेडछाड झाल्याचा आरोप अबु आझमींनी केला होता. यावर अक्षय कुमारनं ही विकृत मानसिकता असल्याची टीका केली होती. आता पुन्हा त्याला अबु आझमींनी शिवराळ भाषेत उत्तर दिलंय. अक्षयने एक शिवी दिली तर मी तीन शिव्या देणार,अक्षयसारख्या लोकांमुळे समाजात अश्लिलता वाढतेय, अशी टीका अबु आझमींनी केलीय.

मात्र बंगरूळूच्या एम जी रोडवर बाईकस्वार मुलांनी  एका मुलीची छेडछाड करून आनंदाच्या वातावरणाला गालबोट लावले. रात्री अडीच वाजता घरी परतताना रस्त्यात एका मुलीचा विनयभंग करण्यात आला. बॅंगलोर येथे झालेल्या मुलीच्या छेडछाडी प्रकरणी देशभरात अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काहींच्या मते, मुलींचे तोटे कपडे आणि वर्तन त्यांच्या छेडछाडीला कारणीभूत ठरतं. 21 व्या शतकात आणि विकसनशील देशात आजही अशाच प्रकारचे विचार केले जात असल्याने अनेकांकडून या  गोष्टीचा निषेध केला जात आहे.

अक्षय कुमारने सोशल मिडीयावर एका व्हिडीयोच्या माध्यमातून आपल्या मनातील संताप व्यक्त केला आहे. अक्षयच्या मते, रात्री-अपरात्री मुलीची छेडछाड करणारे काही पुरूष आपल्या  समाजातीलच एक भाग असल्याची लाज वाटते. अशाप्रकारचे कृत्य नींदनीय आहे.यावेळी अक्षय कुमारने मुलींना स्वावलंबी होण्याचा सल्ला दिला आहे. तसंच, स्त्री म्हणजे कमजोर आणि पुरूष बलवान हा समज दूर करा. तुमची कोठेही छेडछाड झाल्यास त्याला पलटून प्रतिकार करा. सहनशील न बनता मार्शल आर्टचे शिक्षण घ्या. अनेक लहान लहान ट्रिक्स वापरून प्रत्येक स्त्रीला स्वतःचे रक्षण करणं अगदीच शक्य  आहे. मात्र त्यासाठी प्रत्येकीने सक्षम होणं गरजेचं असल्याचंही त्याने म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Loading...
Loading...
Loading...
Loading...

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 5, 2017 08:45 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close