S M L

धोनीच्या करिअरमधल्या या 5 धाडसी निर्णयांबद्दल तुम्हाला माहितीये का?

Samruddha Bhambure | Updated On: Jan 5, 2017 07:36 PM IST

धोनीच्या करिअरमधल्या या 5 धाडसी निर्णयांबद्दल तुम्हाला माहितीये का?

  • जोगिंदर शर्माला दिली अखेरची ओव्हर -

136856251

2007 च्या पहिल्या टी-20 वर्ल्ड कप फायनलमध्ये, पाकिस्तानला विजयासाठी अखेरच्या ओव्हरमध्ये फक्त 13 रन्सची गरज होती. हरभजनसिंगची एक ओव्हर शिल्लक असतांनाही, धोनीनं हरियाणाच्या नवख्या जोगिंदर शर्माला, अखेरची ओव्हर देण्याच धाडस दाखवल. मिसबाह-उल-हक जबरदस्त फॉर्ममध्ये असतांना, धोनीनं हा धाडसी निर्णय घेतला. त्यातही जोगिंदरनं वाईडनी सुरुवात करत सगळ्यांच्या ह्दयाचा ठोका चुकवला होता. त्यानंतर मिसबाहनं सिक्स ठोकल्यानंतर मॅच संपल्यातच जमा वाटत असतांना,जोगिंदरनं ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलेला बॉल भिरकावण्याच्या नादात, मिसबाहनं श्रीसंतच्या हातात कॅच दिला. आणि भारतानं पहिल्या टी-20 वर्ल्डकपवर आपलं नाव कोरलं.

Loading...

  • 2011 वर्ल्डकप फायनल युवराजच्या आधी बॅटिंग -

63177

2011 च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये धोनीनं पुन्हा एकदा असाच धाडसी निर्णय घेतला. 28 वर्षांनंतर भारताला एकदिवसीय वर्ल्ड कप जिंकण्याची संधी होती. 31 रन्सवर भारताच्या दोन विकेट्स गेल्या होत्या. 275 रन्सच टार्गेट भारतापुढे होतं. आणि सुरुवात डळमळीत झाली होती. त्यानंतर धोनीनं युवराज सिंगच्या अगोदर बॅटिंगला येण्याचा निर्णय घेतला. आणि हा धाडसी निर्णयही त्यानं खरा करुन दाखवला.79 बोल्समध्ये नाबाद 91 धावांची खेळी केली. सिक्स मारत धोनीनं पुन्हा एकदा टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून दिला.

  • ईशांत शर्माला दिली ओव्हर -

48560

2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये, इंग्लडपुढे विजयासाठी 130 रन्सचं आव्हान होतं. पावसामुळे फायनल 20 ओव्हरची खेळवण्यात येत होती. 18 बाॅल्समध्ये, इंग्लंडला विजयासाठी 28 रन्सची आवश्यकता होती. अशा वेळी अश्विन आणि जाडेजाच्या ओव्हर्स शिल्लक असतांना, अत्यंत महत्त्वाचा असा 18 वा ओव्हर ईंशांत शर्माला देण्याचा निर्णय धोनीनं घेतला. आणि ईशांत दोन विकेट्स घेत , धोनीचा निर्णय योग्य ठरवला.

  • ईशांत बदलवायला लावली बोलिंग अॅक्शन -

England v India: 2nd Investec Test - Day Five

2014मध्ये भारतानं लॉर्ड्सवर ऐतिहासिक विजयाची नोंद केली. मोईन अली, जो रुट अत्यंत सावध बॅटिंग करत असतांना,भारताला विजय लांबत चालला होता. अशा वेळी धोनीनं ईशांत शर्माला शॉर्ट बोलिंग करायला सांगितल. महत्त्वाच म्हणजे ईशांत सुरुवातीला त्यासाठी तयार नव्हता, पण त्यानंतर ईशांत तयार झाला. आणि तिथून पुढे ईशांतनं पाच विकेट्स घेत भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.

  • 2016 टी-20 वर्ल्ड कप -

2016 च्या टी-20 वर्ल्डकपमध्ये, भारताविरुद्धच्या सामन्यात, बांगलादेश विजयाच्या उंबरठ्यावर होता. मुशफिकार रहीम आणि महमुदल्लाह पिचवर टिकून खेळत होते. धोनीपुढे हार्दिक पंड्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. हार्दिकला सलग दोन फोर मारत रहिमनं मॅचमधली हवाच काढली होती. बांग्लादेशला शेवटच्या 3 बोल्समध्ये विजयासाठी दोन रन्सची आवश्यकता होती. त्यानंतर अखेरच्या बोलवर बांग्लादेशला  दोन रन्सची गरज होती. धोनीनं शेवटच्या बॉलअगोदर ग्लोव्हज काढून घेतला. आणि नेमकी हीच हुशारी भारताच्या कामी आली. आणि भारतानं थरारक विजयाची नोंद केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 5, 2017 06:00 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close