S M L

50 देश पालथे घालून हाती काही लागलं नाही - शरद पवार

Sonali Deshpande | Updated On: Jan 5, 2017 01:58 PM IST

50 देश पालथे घालून हाती काही लागलं नाही - शरद पवार

05 जानेवारी : 'परदेशात फिरून आणि 50 देश पालथे घालूनही काही हाती लागलं नाही, त्यामुळेच मोदींनी नोटबंदीचा निर्णय घेतला' अशा खरमरीत शब्दात शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समाचार घेतला. मोदींची नक्कल करत राज्य आणि केंद्र सरकारच्या शेतीविषयक धोरणांवर त्यांनी टीका केली.नाशिकमध्ये झालेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.

नोटाबंदीचा सर्वाधिक फटका शेतक-यांना बसला. त्यामुळे सर्वच पिकांचा हमीभाव मिळाला नाही.कांदा - टोमँटो - वांगी सर्व पिकांचे भाव सध्या पडलेत. पिकांचा उत्पादन खर्च निघत नाही. मी माझी 2 एकर वांगी जमीनोदस्त केली. एवढंच नाही तर सर्वोच्च न्यायालयाने जिल्हा बँकांवरील निर्बंध हटवण्याचे आदेश देऊनही सरकारने ते हटवले नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागाला मोठा फटका सहन करावा लागला असंही त्यांनी स्पष्ट केलं.

200 हून अधिक शाखा असलेल्या बँकांवर अविश्वास दर्शवल्याने त्यांच्या विश्वासार्हतेला तडा गेल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलंय. नोटांचा रंग जाण्यापासून ते छबू नागरेपर्यंत सगळ्याच विषयांवर पवारांनी आपली मतं व्यक्त केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 5, 2017 01:58 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close