05 जानेवारी : गेल्या अनेक वर्षांपासून शाहू प्रेमींचे स्वप्न असलेल्या राजर्षी शाहू महारांजाच्या स्मारकाचा भूमिपूजन कार्यक्रम काल पार पडला. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरीमध्ये शाहू महाराजांचे वंशज मालोजी राजेंच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला.
शाहू महाराजांचं स्मारक व्हावं म्हणून शाहुप्रेमी जनता बरीच वर्ष प्रयत्न करत होती. त्याला मूर्त स्वरूप आलंय. शाहूंच्या स्मारकामुळे पुढील पिढीला लोकराजाचा इतिहास समजण्याच्या दृष्टीनं या स्मारकाला वेगळं महत्त्व आहे.
या कार्यक्रमाला शाहूप्रेमी जनतेनं मोठ्या संख्येनं हजेरी लावली होती.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv