S M L

सदाभाऊ खोत भाजपच्या वाटेवर?

Sonali Deshpande | Updated On: Jan 5, 2017 11:17 AM IST

सदाभाऊ खोत भाजपच्या वाटेवर?

 

05 जानेवारी : सदाभाऊ खोत हे भाजपाच्या वाटेवर असल्याचं वृत्त आहे. कारण सदाभाऊंना मंत्रीपदं वाढवून देताना मुख्यमंत्र्यांनी राजू शेट्टींशी कसलीही चर्चा केलेली नाही. त्यामुळे शेट्टी नाराज असल्याचं समजतंय. त्यावरून सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी यांच्यातही बेबनाव असल्याचंही वृत्त आहे.

पण हे वृत्त खोटं असल्याचा दावा राजू शेट्टी यांनी आयबीएन लोकमतशी बोलताना केला. खोत हे माझे 35 वर्षापासूनचे मित्र आहेत आणि त्यांना आगाऊ मंत्रीपदं मिळत असतील तर आम्हाला त्याचा अभिमान असल्याचं शेट्टी म्हणालेत. पण खोतांना मंत्रीपद वाढवून देताना मुख्यमंत्र्यांनी तुमच्याशी सल्लामसलत केलं होतं का ह्या प्रश्नाला मात्र शेट्टींनी बगल दिली.

गेल्या काही दिवसांपासून शेट्टी आणि खोत यांच्यात मतभेद असल्याचं उघड झालंय. खोत हे मुख्यमंत्र्यांच्या जवळ गेले असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेत ते लवकरच बाहेर पडतील अशी चर्चा आहे.

Loading...
Loading...
Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 5, 2017 10:49 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close