शरद पवारांनी काळा पैशाची शेकोटी करावी -विनोद तावडे

Sachin Salve | Updated On: Jan 4, 2017 07:55 PM IST

 शरद पवारांनी काळा पैशाची शेकोटी करावी -विनोद तावडे

04 जानेवारी : शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी नोटबंदीच्य़ा मुद्यावरुन  राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावरच टीकास्त्र सोडलंय. शरद पवारांकडं काळा पैसा असल्यास त्याची आता त्यांनी शेकोटी करावी अशा शब्दात विनोद तावडेंनी पवारांवर टीका केलीये. विनोद तावडे जालन्यातल्या एका कार्यक्रमात बोलत होते.

मुख्यमंत्री ग्रामीण पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून मराठवाडा वाॅटर ग्रीड या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या टप्प्यातील राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छ्ता मंत्री बबनराव लोणीकर यांच्या मतदार संघातील परतूर, मंठा आणि जालना तालुक्यातील एकत्रित 176 गावांना कायम स्वरूपी पाणी पुरवठा करणाऱ्या साखळी योजनेच्या भूमीपूजन समारंभात आज मंत्री तावडे परतूर मध्ये बोलत होते.  यावेळी त्यांनी शरद पवार आणि अजित पवारांवर टीकास्त्र सोडलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटा बंदी केल्यानंतर ज्याच्याकडे काळा पैसा होता त्यांच्या पोटात दुखायला लागले  शरद पवार आणि जेथलिया ना मोठा त्रास झाला आता थंडीचे दिवस आहेत त्यांना म्हणा चला शेकोटी करू, हुर्डापार्टी करू असे तावडे म्हणाले. पवारांकडं काळा पैसा असेल म्हणून त्यांच्या पोटात दुखतंय असा टोलाही त्यांनी लगावला.

अजित पवार यांच्या सारख्या  द्वाड विद्यार्थ्यांची केवळ मीच ट्युशन घेऊ शकतो कारण  मी या राज्याचा शिक्षणमंत्री  आहे, आणि मलाच अशा सगळ्या द्वाड विद्यार्थ्यांची शिकवणी घेण्याचा अनुभव आहे त्यांनी माझ्या कडे ट्युशन लावावी,  एवढे सगळी विकासाची कामे  झाल्यावर अजित पवारांना दिसत नाहीत त्यांनी जरा टोपेंना ,जेथलिया यांना विचारावे अशी टीकाही विनोद तावडे यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 4, 2017 07:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close