निवडणुका होईपर्यंत अर्थसंकल्प सादर करू नका -उद्धव ठाकरे

  • Share this:

uddhav_thackery_sppech04 जानेवारी : निवडणुका तोंडावर आहे, आधीच भाजप सरकार थापा मारण्यात पटाईत आहे.  त्यामुळे निवडणुका होईपर्यंत राष्ट्रपतींनी अर्थसंकल्प मांडू देवू नये. अर्थसंकल्पात केंद्र सरकार भुलथापा देण्याची शक्यता आहे अशी मागणीच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलीये. तसंच निवडणूक लढवायची असेल तर उघडपणे लढवा  असं आव्हानचं उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिलं.

मुंबईतील रंगशारदा सभागृहात शिवसेनेचा राज्यव्यापी मेळावा पार पडला. यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजपवर सडकून टीका केली. कुणी घऱाणेशाहीचा आरोप करत असेल तर खुशाला करा. पण,  जे पटत नाही ते बोलणारच, मग कुणीही असो. देशात कुणी काहीही बोलत असले तरी शिवसेना काय बोलते याकडे देशाचं लक्ष लागलंय.  त्यामुळे मला बोलू न देणारा जन्माला आला नाही आणि मला जे बोलायचं ते मी बोलणारच असं उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं.

मोदींनी फक्त मृगजळ दाखवलं

त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे वळवला.  मोदींनी फक्त मृगजळ दाखवलं. त्यांनी केलेल्या घोषणा हवेत विरुन गेल्या आहे. ज्या घोषणा आधीच झाल्या आहेत त्याच नव्याने सांगितल्या आहे. पण अच्छे दिन कधी येणार हे मात्र सांगितलं नाही. उलट आता असं आम्ही म्हणालोच नाही असा दावाच ते करत आहे असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. पुरोहितांना धाडी टाकल्या जात आहे. पण, मल्ल्या आणि लल्या देश सोडून पळून गेले आहे. त्यांना मात्र यांना पकडता आलं नाही. विजय मल्ल्याने दारू बनवून पैसा कमावला पुरोहितांने काय केलंय ?, मंदिर वही बनायेंगे आणि धाड पण वही डालेंगे असा टोलाच उद्धव ठाकरेंनी लगावला.

तोपर्यंत अर्थसंकल्प मांडू नका

भाजपनं लोकांना फसवलं. फक्त घोषणा देवून आशा निर्माण केली.  मुळात नोटबंदी म्हणजे भूल न देता ऑपरेशन होतं. आता चूक लक्षात आल्यानं आता भूलथापा देत आहे. मोदींनी घोषणा केली की, गर्भवती महिलांना 6 हजार रुपये देणार ? , पण घोषणा आधीच्या सरकारनेच केली होती. त्यामुळे आता या सरकारच्या भुलथापांना बळी पडू नका.  निवडणुका जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अर्थसंकल्प मांडू नका अशी मागणीच राष्ट्रपतींकडे आम्ही करणार आहोत. जेणे करून अर्थसंकल्पात केंद्र सरकार भुलथापा देऊ शकणार नाही. असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

 तर उघडपणे लढा

आता निवडणुकीचे पडघम वाजायला सुरूवात झालीये. काहीही वावड्या उठत आहे. पण निवडणूक लढवायची असेल तर उघडपणे लढवा. याचा त्याचा आसरा घेऊन मैदानात येई नका असं म्हणत भाजपनं एमआयएमसह सगळ्या पक्षांशी युती केली असा आरोपच उद्धव ठाकरेंनी केला. तसंच भाजपशी युती सन्मानानेच होईल पण लाचारीनं युती करणार नाही असंही उद्धव ठाकरेंनी बजावलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 4, 2017 06:31 PM IST

ताज्या बातम्या