03 जानेवारी : पाणी फाऊंडेशन सत्यमेव जयते वॉटर कपच्या दुसऱ्या पर्वाची आज घोषणा करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अभिनेते आमीर खान यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात ही घोषणा झाली. पाणी फाऊंडेशनच्या पहिल्या पर्वात तीन तालुके तर दुसऱ्या पर्वात 30 तालुक्यांमध्ये हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. या उपक्रमात, ज्या गावांमध्ये जलसंधारणाचं चांगलं काम होईल त्या गावांना वॉटर कप देऊन सन्मानित करण्यात येतं.
पाणी फाऊंडेशनच्या पहिल्या पर्वात 1 हजार 368 कोटी लिटर पाणी साठवण्यात आलं. यानिमित्ताने एक गाणंही रिलीज करण्यात आलंय. आमीर खानची पत्नी किरण राव आणि अजय गोगावलेनं ह गाणं गायलंय तर सैराटचे दिग्दर्शक नागराज मंजुळेंनी हे गाणं दिग्दर्शित केलंय.
दरम्यान, या कार्यक्रमात आमीर खानने बंगळुरुमध्ये झालेल्या घटनेबद्दल आपली भूमिका मांडली. आम्ही आमच्या चित्रपट आणि शोद्वारे महिलांप्रती संवेदना जागृत करण्याचा प्रयत्न करतोय. सरकारने बंगळुरूमध्ये झालेल्या प्रकारावर कठोर भूमिका घ्यायला पाहिजे, असं आमीर खान म्हणाला.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा