साखर सांडली असेल तर मुंगळे येणारच-अबु आझमींनी तोडले तारे

Sachin Salve | Updated On: Jan 3, 2017 04:13 PM IST

साखर सांडली असेल तर मुंगळे येणारच-अबु आझमींनी तोडले तारे

 03 जानेवारी : समाजवादी पक्षाचे नेते अबु आझमी यांनी महिलांबद्दल पुन्हा एकदा एक संतापजनक विधान केलंय. साखर उघड्यावर सांडली असेल तर मुंगळे त्यापासून लांब राहू शकत नाहीत, असे तारे अबु आझमींनी तोडलेत.

याआधीही अबु आझमींनी महिलांवरच्या अत्याचारांबद्दल असं बेजबादार वक्तव्य केलं होतं. महिला तोकडे कपडे घालून अत्याचार आणि छेडछाड ओढवून घेतात, असं अबु आझमी म्हणाले होते. हा पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव आहे, अशी टिप्पणीही त्यांनी केली होती. आणि आता महिलांबद्दल असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलंय.

बंगळुरूमध्ये न्यू इयर पार्टीमध्ये महिलांवर अत्याचार झाले. या प्रकरणी पोलिसांनी अजून तक्रारही दाखल करून घेतलेली नाही. या प्रकरणी कारवाई करण्याऐवजी राजकीय नेते त्याबदद्ल बेताल वक्तव्यं करतायत. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी याआधीच ही एकच बातमी आहे का , असा सवाल केलाय. त्यातच अबु आझमींच्या वक्तव्यांवर संतापजनक प्रतिक्रिया उमटतायत.

बंगळुरूमध्ये महिलांवर अत्याचार करणाऱ्यांचे फोटो आणि पुरावे असूनही या गुंडांना अटक होत नाहीये. पण या सगळ्या परिस्थितीत राजकीय नेते मात्र अशी बेताल वक्तव्यं करतायत. हे आपल्या विकृत मानसिकतेचंच लक्षण आहे, अशी टीका होतेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 3, 2017 04:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close