अण्णांची आता 'सहकार' लढाई, पवारांविरोधात कोर्टात धाव

अण्णांची आता 'सहकार' लढाई, पवारांविरोधात कोर्टात धाव

  • Share this:

anna_vs_pawar03 जानेवारी : राज्यातील सहकारी साखर कारखाने आर्थिकदृष्ट्या तोट्यात आणून नंतर त्याची बेकायदा आणि कवडीमोल भावानं विक्री करुन सहकार चळवळीचं प्रचंड नुकसान केल्याची तक्रार करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि पक्षाचे नेते अजित पवार यांच्यासह इतर राजकीय नेत्यांची घोटाळा केला असा आरोप करत  ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे.

या सगळ्या प्रकरणात सरकारी तिजोरीचं २५ हजार कोटी रुपयांचं नुकसान करत राज्यावरही एक लाख कोटी रुपयाचं कर्ज लादलं असा गंभीर आरोप या याचिकेत करण्यात आला आहे. याविषयी कॅगच्या अहवालासह इतरही अहवाल उपलब्ध असून त्यांच्या आधारे या प्रकरणांची सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी फौजदारी याचिका करण्यात आली आहे. ज्या कारखान्यांची बेकायदेशीरपणे विक्री करण्यात आली आहे ते ताब्यात घेण्यात यावेत अशी दिवाणी याचिका करण्यात आली आहे. कारखान्यांचे हस्तांतरण तसंच विलीनीकरण यांना दिलेल्या सरकारी परवानग्या रद्द करण्यात याव्यात, राज्य सरकार, सहकार आणि साखर आयुक्त यांना आजारी कारखान्यांना पुनरज्जिवीत करण्याचे आदेश द्यावेत, तसंच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांवर प्रशासक नेमण्याचे आदेश नाबार्ड रिझर्व्ह बँकेला देण्यात यावेत अशी मागण्या या याचिकेत करण्यात आल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: January 3, 2017, 3:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading