News18 Lokmat

पालिकेवर भगवा फडकणार, उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jan 2, 2017 09:27 PM IST

uddhav_thackery_on_cm02 जानेवारी : मुंबई पालिकेवर भगवाच फडकणार आणि  शिवसेनेचा महापौर झाल्यावर परत येऊ असे सांगत त्यांनी महापालिका निवडणुकीत शिवसेनेचाच विजय होईल असा विश्वास शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर उद्धव ठाकरेंनी हा विश्वास व्यक्त करुन भाजपला थेट आव्हानच दिलं आहे.

मुंबई महापालिकेत प्रबोधनकार ठाकरे यांच्या तैलचित्राचे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत अनावरण झाले. यावेळी दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर एकत्र आले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना व्यासपीठावर थेट आव्हान दिलं.  5 वर्षांची कारकिर्द पाहता मुंबई पालिकेवर भगवाच फडकणार आणि आपलाच महापौर पुन्हा खुर्चीवर विराजमान होईल. त्यावेळी पुन्हा इथं येऊ असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला. उद्धव ठाकरे बोलताच आवाच कुणाचा...शिवसेनेचा या घोषणांनी सभागृह दणादणून गेलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 2, 2017 07:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...