ओवेसी म्हणतात, 'भाजप माझ्यामुळेच निवडणूक जिंकली'

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jan 2, 2017 09:02 PM IST

ओवेसी म्हणतात, 'भाजप माझ्यामुळेच निवडणूक जिंकली'

asaduddin owaisi02 जानेवारी : भाजपच्या विजयाला मीच जबाबदार आहे असं विधान केलंय एमआयएमचे खासदार असोदद्दीन ओवेसी यांनी...एवढंच नाहीतर त्यांच्या म्हशीला दूध आले नाहीतर मीच जबाबदार का ? असा सवालच ओवेसींनी उपस्थिती केलाय.

त्याचं झालं असं की,  एमआयएमचे खासदार असोदद्दीन ओवेसी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे प्रसिद्ध आहेत. पण माध्यमांच्या प्रश्नांना ते तेवढ्याच सावधपणे उत्तरं देतात. ओवेसींना ही कला चांगलीच अवगत असली तरी नेहमीच त्यांना त्यांचा संयम राखता येत नाही. औरंगाबादमध्ये माध्यम प्रतिनिधींनी ओवेसींना भाजपसोबत साटंलोटं असल्याच्या आरोपाबाबत विचारलं. हे विचारल्यानंतर ओवेसींनी राग आला. संतापाच्या भरात ते नको ते बोलून गेले.

ओवेसी म्हणतात,  चाय पे चर्चा झाली बिस्किट मी आणले, पत्ती कुणी तरी आणली आणि पण मला बिना साखरेचा चहा पाजला. 46 जागांवर भाजप जिंकली. ती माझ्यामुळे जिंकली. 280 जागा लोकसभेत जिंकले ते माझ्यामुळे, काश्मिरमध्ये जिंकले ते माझ्यामुळे, झारखंड जिंकले ते माझ्यामुळे...असा संतापच ओवेसींनी व्यक्त केला.

तसंच महाराष्ट्रात विधानसभेत 24 जागा आम्ही लढलो त्यात 2 जागा आम्ही जिंकल्यात.  या निवडणुकीत 60 लाख मतदान झालं. त्यापैकी 5 लाख मतं माझ्या 24 उमेदवारांना मिळलं. मग 55 लाख मत कुणाला मिळाली ? असा सवालच त्यांनी विचारला.

राष्ट्रवादी आणि काँग्रेसला त्यांचा अहंकार बुडवणार आहे. एवढी मतं घेऊनही काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा मुस्लिम मतदार राखता आला नाही. त्यांचा मतदार हा भाजपकडे वळला. मग तुमचा मतदार कुठे आहे अशी कबुलीच ओवेसींनी दिली.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 2, 2017 09:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...