S M L

आयसिसनेच घडवला इस्तंबूलमध्ये बॉम्बस्फोट

Samruddha Bhambure | Updated On: Jan 2, 2017 04:16 PM IST

आयसिसनेच घडवला इस्तंबूलमध्ये बॉम्बस्फोट

02 जानेवारी : इस्तंबूल दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी आयसिसने घेतलीय. इस्तंबूलमध्ये नव्या वर्षाचं सेलिब्रेशन सुरू असताना हा हल्ला झाला होता. यात 39 जणांचा मृत्यू ओढवलाय.  इस्तंबूलच्या नाईटक्लबमध्ये एका बंदूकधारी इसमाने गोळीबार सुरू केला. यात वेगवेगळ्या 12 देशांमधले लोक मृत्युमुखी पडले. हा हल्लेखोर उझबेकिस्तान किंवा किरगिझस्तानचा असावा, असा तपास यंत्रणांना संशय आहे.

नाईटक्लबमध्ये घुसलेल्या या हल्लेखोराकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्रं होती आणि तो पूर्णपणे काळ्या वेशात आला होता.या दहशतवाद्यांने  नाईट क्लबमध्ये घुसून बेछूट गोळीबार सुरू केला. या गोळीबारात 70 जण जखमीही झाले. आयसिसने या हल्ल्याची जबाबदारी घेणारं एक पत्रक काढलंय. आणि या दहशतवाद्याचा उल्लेख लढवय्या सेनानी असा केलाय.


2016 हे वर्ष तुर्कस्तानसाठी दहशतवादी हल्ल्यांचं ठरलं. तुर्कस्तानची राजधानी अंकारा आणि इस्तंबूल या दोन्ही शहरांमध्ये भीषण बॉम्बस्फोट झाले. त्यासोबतच तुर्कस्तानमध्येच रशियाचे राजदूत आंद्रे कार्लोव्ह यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. या घटनानंतरही 2017 चं स्वागत करतानाच इस्तंबूलमध्ये पुन्हा बॉम्बस्फोट झालाय. त्यामुळे तुर्कस्तानवरचं दहशतवादाचं संकट शमण्याची चिन्हं नाहीत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 2, 2017 01:14 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close