मोहम्मद कैफच्या सूर्यनमस्कारांवर टीका

मोहम्मद कैफच्या सूर्यनमस्कारांवर टीका

  • Share this:

MOHAMMAD KAIF

02 जानेवारी : मोहम्मद शामीनंतर आता क्रिकेटपटू मोहम्मद कैफने ट्विटरवर शेअर केलेल्या फोटोवर टीका होते आहे.कैफने सूर्यनमस्कार करतानाचे फोटो ट्विटरवर शेअर केले होते.या फोटोवर काही फॉलोअर्सने टीका केलीय.सूर्यनमस्कार करणाऱ्या कैफवर काही जणांनी धर्माचा अपमान केल्याचा आरोप केला.मात्र व्यायामाने सर्वांना फायदाच असतो.याचा कोणत्या धर्माशी काहीही संबंध नाही, असं प्रत्युत्तर कैफने दिलं.

दुसरीकडे मोहम्मद शामीने पुन्हा एक फोटो शेअर केलाय.मोहम्मद शामीने नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत फोटो शेअर केला आहे. या फोटोसाठी त्याने कवितेच्या ओळी टाकत शुभेच्छा दिल्या आहेत. ,'ना साथी है ना हमारा है कोई ना किसी के हम। पर आपको देख कर कह सकते हैं एक प्यारा सा हमसफर है कोई' अशा काव्यात्मक शुभेच्छांसहित शामीने पत्नीसोबतचा फोटो शेअर केला आहे.

काही दिवसांपूर्वी शामीने फेसबूक आणि ट्टिवरवर आपली पत्नी आणि मुलीसोबतचा एक फोटो शेअर केला होता. ज्यावरून शामीला धर्म आणि संस्कृतीच्या रक्षकांकडून टीकेचा सामना करावा लागला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: January 2, 2017, 10:00 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading