S M L

भोजनेंना शहीद दर्जा देण्याचं तोंडी आश्वासन

Sonali Deshpande | Updated On: Jan 1, 2017 07:54 PM IST

भोजनेंना शहीद दर्जा देण्याचं तोंडी आश्वासन

01जानेवारी : 10 डिसेंबरला महालक्ष्मी कारशेडमध्ये ओव्हरहेड वायरमध्ये अडकलेला पक्षी काढताना जखमी झालेले अग्निशमन दलाचे जवान राजेंद्र भोजने यांचं काल रात्री निधन झालं. वायरवर अडकलेला पक्षी काढताना भोजनेंना शॉक लागला होता, ज्यामुळे ते गंभीर जखमी झाले होते.त्यांच्यावर ऐरोलीच्या नॅशनल बर्न्स सेंटरमध्ये उपचार सुरू होते.

मुंबई फायरब्रिगेडचे जवान राजेंद्र भोजने यांचा मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतलाय. भोजने यांना शहीदाचा दर्जा देण्याचं तोंडी आश्वासन दिल्यानंतर भोजने यांच्या कुटुंबियांनी त्यांचं पार्थिव ताब्यात घेतलं. त्यानंतर त्यांना आज फायरब्रिगेडच्या मुख्यालयात सलामी देण्यात आली. सुरुवातीला भोजनेंच्या नातेवाईंकांनी त्याचं पार्थिव ताब्यात घेण्यास नकार दिला होता. पण अधिकाऱ्यांनी समजूत काढल्यानंतर मृतदेह ताब्यात घेतला. 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 1, 2017 12:30 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close