सोळावं सरलं, सतरावं लागलं !

सोळावं सरलं, सतरावं लागलं !

  • Share this:

happy_new_year_201701 जानेवारी 2017 : सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचं धूमधडाक्यात स्वागत झालंय. रात्रीच्या 12 च्या ठोक्याला ‘हॅपी न्यू इयरsss’चा एकच जयघोष सर्वांच्या तोंडी होता…जे झालं ते झालं आता नवी सुरुवात, नवे संकल्प, नवा आशांना मनात रुंजी घालून जो तो नव्या वर्षांच्या जल्लोषमय रात्री न्हाहुन गेला. सर्वत्र ओसाडून वाहणार्‍या जल्लोषाने शहराच्या शहर बहरून गेली. कुठे हॉटेलमध्ये आपल्या कुटुंबियांसोबत, तर कुठे डीजेच्या ठेक्यावर बेधूंद होऊन, तर कुठे ‘एकच प्याला’ रिचवतं 2017 या नव्या वर्षांचं दमदार स्वागत करण्यात आलंय.

प्रत्येक वर्ष सरतं आणि नवं वर्ष येतं…पण प्रत्येक वर्ष हे सर्वांसाठी नवं काही घेऊन येतं…नव्या अपेक्षा,आशा आणि स्वप्नांना भरारी देणारं हे वर्ष असावं अशी सापेक्ष अपेक्षा असतेच..आज 2016 चा सूर्य अस्ताला गेला. जगाच्या पाठीवर नव्या वर्षाचं जल्लोषात स्वागत झालं ते अॅाकलंडपासून...त्यापाठोपाठ सिडनीत नव्या वर्षाचं जल्लोषात स्वागत झालंय. सिडनीच्या ऑपेरा हाऊस आणि हार्बर ब्रिजवर डोळे दिपून जाणारी रोषणाई करण्यात आली होती. त्यानंतर  भारताच्या अतिपूर्वेला असलेल्या सिडनीचं घड्याळ भारताच्या आधी साडेपाच तास असतं. त्यामुळे 2017 चे आगमन झालं आणि काही तासांतच या नव्या वर्षानं संपूर्ण जगाला आपल्या कवेत घेतलं.

भारतात नव वर्षाची धामधूम तर काही औरच असते. ‘दिल्ली ते गल्ली’ नव्या वर्षाच्या स्वागतासाठी एकच तयारी असते. जो तो आपल्या परीने थर्टी फर्स्टचं प्लॅनिंग करून रात्रीच्या 12 च्या ठोक्याची वाट पाहून असतो..जसा जसा वेळ जवळ येतो तसा उत्साहाला चांगलंच उधाण येतंय. देशाची आर्थिक राजधानी अर्थात मुंबईत नवं वर्षाच्या स्वागत काही खासचं असतं. मुंबईत पहाटेपर्यंत नववर्षाच्या स्वागताची धामधूम सुरू असते. सर्व हॉटेल्स रेस्टॉरंट गर्दीने खच्चा खच भरलीये. तर मुंबईला अथांग लागलेल्या समुद्र किनार्‍यावर लोकांनी एकच गर्दी जमलेली असते. तर मुंबईचं ‘क्वीन ऑफ नेकलेस’ समजल्या जाणार्‍या मरीन ड्राईव्ह गर्दीने फुलून गेलीये. जल्लोष करण्यासाठी तरुण, तरुणी इथं जमलेत. तर पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूरमध्ये खास आपल्या स्टाईलने नव्या वर्षाच स्वागत करण्यात आलंय. आयबीएन लोकमत परिवाराकडून तुम्हा सर्वांना हे नवं वर्ष सुख आणि समृद्धीचं जावो..हॅपी न्यू इयर..!!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 1, 2017 12:21 AM IST

ताज्या बातम्या