मेट्रो-3 कारशेड आरे कॉलनीतच !

  • Share this:

aarey colony metro31 डिसेंबर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो 3 प्रकल्पासाठी आरे कॉलनीतील कारशेडच्या 33 हेक्टर जागेला मंजुरी दिली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या विरोधाला न जुमानता, मेट्रो कारशेड आरेतच होणार हे नक्की झालं आहे.

मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच मुंबई मेट्रो-3 साठी आवश्यक जागा त्वरित हस्तांतरीत करण्याचे आदेश मुंबई महापालिकेला दिले आहेत. त्यानंतर आता कारशेडच्या आरेतील जागेला मंजुरी दिल्याने, शिवसेनेला दुहेरी धक्का दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी आरे परिसरातील 33 हेक्टर जागा नो डेव्हलपमेंट झोनमधून वगळला आहे. तसंच इथेच मेट्रो कारशेडच्या जागेला मंजुरी दिली आहे.

यापूर्वी बोरिवलीतील संजय गांधी नॅशनल पार्कची 165 हेक्टर जमीन इको सेन्सिटिव्ह झोनमधून वगळण्याला केंद्रानं हिरवा कंदील दाखवला आहे. राज्याच्या प्रस्तावाला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने हिरवा कंदील दाखवला आहे.

मनसेनंही या मेट्रो कारशेड प्रकल्पाला कडाडून विरोध केला होता. आरेसाठी कारे करणारच असा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता.  त्यामुळे मनसे याबद्दल काय भूमिका घेत हे पाहण्याचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 31, 2016 01:31 PM IST

ताज्या बातम्या