नोटबंदीच्या 50 दिवसात साईंच्या चरणी तब्बल 31 कोटी 73 लाख दान

नोटबंदीच्या 50 दिवसात साईंच्या चरणी तब्बल 31 कोटी 73 लाख दान

  • Share this:

sai_baba_500_100029 डिसेंबर : नोटबंदीचा शिर्डी साईबाबांच्या दानावर कोणताही परिणाम झालेला दिसत नाहीये. कारण नोटबंदीनंतर गेल्या ५० दिवसात शिर्डीत साईमंदिरात ३१ कोटी ७३ लाखांचं दान देण्यात आलेलं आहे.  एकूण  २ किलो ९०९ ग्राम सोनं, ५६ किलो चांदी  जमा झालेत तर व्हीआयपी पेड दर्शनाच्या माध्यमातून ३ कोटी १८ लाख रुपये संस्थानकडे जमा झालेत.

दानपेटीत १८ कोटी ९६ लाख तर देणगी काउंटर वर ४ कोटी २५ लाख रुपये जमा झालेत. तसंच  ऑनलाईन ६ कोटी ६६ लाख आणि डेबीट/क्रेडीट कार्डद्वारे २ कोटी ६२ लाख संस्थानला मिळाले आहेत. चेक/ डीडीद्वारे  ३ कोटी ९६ लाख मिळालेत. प्रसादालय मोफत अन्नदान योजनेअंतर्गत  १६ लाख रुपयांचं दान मिळालंय. गेल्या ५० दिवसात ४ कोटी ५३ लाखांच्या १००० हजार आणि ५०० च्या जुन्या नोटा जमा झाल्या आहेत. ३ कोटी ८० लाखांच्या नव्या नोटा साईचरणी भक्तांकडून अर्पण करण्यात आल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: December 29, 2016, 7:26 PM IST

ताज्या बातम्या