विष्णूदासचा पायी जगप्रवास,पृथ्वी प्रदक्षिणेसाठी हवेत पैसे

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Dec 28, 2016 01:39 PM IST

विष्णूदासचा पायी जगप्रवास,पृथ्वी प्रदक्षिणेसाठी हवेत पैसे

vishnu

28 डिसेंबर : मुलगा मुंबईत पत्रकार. तो अशाच एका भेटीत दिलीप दोंडेंना भेटतो ज्यांनी समुद्रमार्गी जगप्रदक्षिणा पूर्ण केलीय. त्यालाही वाटतं आपणही जग फिरावं तेही पायी. पण पैसे कुठून येणार? फार विचार न करता हाती आहे ते पैसे घेतो आणि नोकरी सोडून जग धुंडाळायला निघतो. बघता बघता त्यानं आठ ते नऊ देश पायी पालथे घातलेत. ह्या पोराचं नाव विष्णूदास चापके आणि तो मुळचा परभणी जिल्ह्यातल्या कातनेश्वरचा आहे.

हे पूर्णा तालुक्यात गाव येतं. आता विष्णू चर्चेत पुन्हा आलाय तो त्याची जगभ्रमंती पूर्ण करण्यासाठी त्याच्या वडिलांनी गावची शेती विकायला काढलीय त्यामुळे. तशी जाहिरात त्यांनी फेसबूक, ट्विटरवरही दिलीय. आतापर्यंत विष्णूनं चीन, लाओस, थायलंड, म्यानमार पायी पालथं घातलंय. सध्या विष्णू ऑस्ट्रेलियात आहे. आतापर्यंत तो कुठं एखाद्या भारतीय माणसाकडे राहातो, थांबतो तर कधी रेल्वे स्टेशन्स, मंदिरांमध्ये मुक्काम करतो. विष्णूची ही जगभ्रंमती खडतर आहे.

मित्रांनी, अनोळखी असणाऱ्यांनीही विष्णूला आतापर्यंत मदत केलीय. पण त्याची भ्रंमती पहाता त्याला पैसा कमी पडतोय आणि म्हणूनच शेवटी वडिलांनी जमीन विकायला काढलीय. विष्णूचा हा प्रवास अफलातून आहे. पुढची एक-दीड वर्षे तरी त्याला पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी लागणार आहेत. एवढ्या मोठ्या कालावधीसाठी त्याला तेवढ्याच पैशाची गरजही आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 28, 2016 01:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...