देशाची अर्थव्यवस्था दगावल्याची परिस्थिती -शरद पवार

  • Share this:

Sharad pawar213बारामती, 27 डिसेंबर : नोटाबंदी नंतर आता संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था दगावल्याच्या परिस्थिती निर्माण झाली आहे अशी टीका माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केलीये. पन्नास दिवस होत आलेत पण ही परिस्थिती अजून काही महिने राहील. याचा सर्वात जास्त परिणाम हा शेती अर्थव्यवस्थेवर झाला  असून भाजप सरकार संपूर्ण सहकारी अर्थव्यवस्था उध्द्वस्त करायला निघालेत असेही पवार म्हणाले.

24 व्या नॅशनल चिल्ड्रेन सायन्स कॉंग्रेस' अर्थात बालवैज्ञानिक प्रदर्शनाचे आज बारामतीत उदघाटन झाले. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञानमंत्री डॉ.हर्षवर्धन, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी पुन्हा एकदा शरद पवारांनी नोटबंदीवर टीका केली. सहकारी बँकाबाबत आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो आणि सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला बँकांच्या बाजूने पण अजून त्याची अंमलबजावणी झाली नाही.ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या सोसायट्या आणि जिल्हा मध्यवर्ती बँका या उध्द्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत अशी भीतीही पवारांनी बोलून दाखवली.

प्रत्येक  नोटेवरती लिहलेल असते,  यावरची  रक्कम देण्यास आम्ही बांधील आसतो हे वचन असतं. ज्या वेळी तुम्ही या नोटा रद्द्द करता त्या वेळी हे वचन मोडलंय अन् ज्या वेळी सरकारकडून हे वचन मोडलं जातंय त्यावेळी लोकांचा व्यवस्थेवरचा विश्वास उडतो आणि हे काही चांगले लक्षण  नाही असं  पवार यांनी  पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: December 27, 2016, 9:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading