S M L

माझ्या सुनेनं मला छळलं, सुसाईड व्हिडिओ रेकाॅर्ड करून सासऱ्याची आत्महत्या

Sachin Salve | Updated On: Dec 26, 2016 08:51 PM IST

माझ्या सुनेनं मला छळलं, सुसाईड व्हिडिओ रेकाॅर्ड करून सासऱ्याची आत्महत्या

26 डिसेंबर : सासऱ्याची आपल्यावर वाईट नजर असल्याची सुनेनं तक्रार केल्यानं व्यथित झालेल्या सासऱ्याने राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अंबरनाथ भास्करनगर परिसरात घडली. सासरा बाबू शेख यानं गळफास लावून आत्महत्या करण्यापूर्वी व्हॅाटस्अॅपवर व्हिडिओ रेकॅार्ड केलाय. अनेकदा महिला वर्गाकडून  खोट्या तक्रारी करण्याच्या  घटनांमध्ये वाढ होत असतांना बाबू शेख हे अशाच एका खोट्या तक्रारींचे बळी ठरले आहेत.

भास्करनगर परिसरात राहणारे बाबू शेख यांच्यावर त्यांची सून हिना शेख हिने वाईट नजर असल्यासंबंधी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती, शिवाय परिसरात बाबू यांची बदनामी केल्याने बाबू हे गेल्या काही दिवसंपासून व्यथित झाले होते. अखेर कोणालाही तोंड दाखवायला जागा उरली  नसल्याने बाबू शेख यांनी  गळफास घेऊन आत्महत्या केली.

धक्कदायक म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी काही मिनिटं अगोदर बाबू शेख यांनी  आपल्या मोबाईलमध्ये  सेल्फी व्हिडिओ शूट केला असून यात आपल्या सुनेने केलेल्या खोट्या आरोपांमुळे कुठेही तोंड दाखवायला जागा नसल्याने आपण आत्महत्या करीत असल्याचे स्पष्ट केलं आहे.


या प्रकरणी सुरुवातीला पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली मात्र नंतर व्हिडिओ पाहिल्यानंतर सून हिना शेख, तीचे वडील कासम शेख आणि भाऊ अब्दुल कासम शेख या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  23 डिसेंबरला हा सगळा प्रकार घडला असून अजून या प्रकरणी कोणालाच अटक केलेली नाही.या प्रकरणी पोलिसांनी बोलण्यास मात्र नकार दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 26, 2016 08:33 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close