'गोल्डमॅन' होणं महागात पडलं, अंगावरचं 55 तोळं सोनं लुटलं

'गोल्डमॅन' होणं महागात पडलं, अंगावरचं 55 तोळं सोनं लुटलं

  • Share this:

navi_mumbai_Crime326 डिसेंबर : अंगावर सोनं बाळगण्याची काही लोकांना भलतीच हौस असते. नवी मुंबईतले सुनील पाटील हे अंगावर चक्क 55 तोळे सोन्याचे दागिने घालत होते. त्यांची ही सोन्याची हौस त्यांना भलतीच महागात पडलीये. सुनील पाटील यांच्या डोक्याला रिव्हॉल्वर लावून 55 तोळे सोनं लुटण्यात आलंय.

सुनील पाटील हे बांधकाम व्यावसायिक असून ते कामोठ्यात राहतात. त्यांच्याकडे घर बुक करण्याच्या बहाण्याने तीन जण त्यांच्या  ऑफिसमध्ये घुसले. काही वेळानंतर या तिघांनी त्यांना रिव्हॉल्वरच्या धाकाने लुटले. सुनिल पाटील यांनी अंगात घातलेले ५५ तोळे सोने लुटले. यामध्ये चेन, अंगठी, ब्रेस्लेट या दागिन्यांचा समावेश आहे.  शिवाय ऑफिसमधील 65 हजारांची रोकडही लुटली. या घटनेनंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून आरोपींचा शोध सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 26, 2016 08:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading