क्रिकेटपटू शमीच्या पत्नीच्या पेहरावावर शेरेबाजी

क्रिकेटपटू शमीच्या पत्नीच्या पेहरावावर शेरेबाजी

  • Share this:

 

shami 226डिसेंबर: मुस्लिम असाल आणि जर फेसबूक किंवा ट्विटरवर बायकोसोबत बुरखा न घालता फोटो शेअर करणार असाल तर भीती बाळगावी अशी स्थिती आहे आणि यातून क्रिकेटपटू मोहम्मद शमीही सुटू शकलेला नाही.

एका सोहळ्याचे शमीनं स्वत:ची पत्नी हसीनसोबतचे फोटो ट्विटर आणि फेसबूकवर शेअर केले. मग काय त्यात कट्टरतावाद्यांच्या उड्या पडल्या. कुणी शमीला तुझी बायको खुप सुंदर आहे पण तिला हिजाबमध्ये ठेव, तर कुणी तुला बायकोला पडद्यात कसं ठेवायचं असतं हे माहित नाही का तर कुणी इस्लाममध्ये बायकोला कसं ठेवायचं हे तुला शिकवणं गरजेचं आहे अशा भाषेत कमेंट केलेत.

मोहम्मद शमीची पत्नी हसीन ही खोल गळ्याच्या गाऊनमध्ये आहे. सोबत त्याची छोटीशी मुलगीही आहे. तिच्या अशा पेहरावावर फेसबुकवरच्या उपटसुंभांनी आक्षेप घेत शेरेबाजी केलीय. तर ट्विटरवर मात्र शमीचं कौतुक करणारे कमेंट पडलेत. विशेष म्हणजे बायकोला कसं ठेवायचं हे शमीनं पठाण ब्रदर्सकडून शिकावं असेही सल्ले दिले गेलेत.

क्रिकेटपटू इरफान पठाण त्याच्या पत्नीसोबतचे फोटो शेअर केले होते तेही बुरख्यातले. क्रिकेटपटू मोहम्मद कैफनं मात्र फेसबुकवर अशी भाषा वापरणाऱ्यांना थोडीशी तरी लाज बाळगा अशा भाषेत खडसावलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: December 26, 2016, 10:21 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading