शरद पवार अडकले ट्रॅफिक जॅममध्ये

शरद पवार अडकले ट्रॅफिक जॅममध्ये

  • Share this:

pawar

25 डिसेंबर : पुणे नाशिक महामार्गावर काही दिवसांपासून वाहतूक कोंडीचा त्रास इथल्या स्थानिकांना तसंच प्रवाशांना करावा लागतोय.मात्र आज या ट्रॅफीक जॅममध्ये माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार हे अडकले होते.तब्बल दीड तास शरद पवार या वाहतूक कोंडीत अडकले होते.

शहरातील रस्त्यालगत सुरु असलेली अवैध वाहतूक तसंच रस्त्यामधील अतिक्रमणामुळं इथे रोजच मोठी वाहतूक कोंडी होते.अगदी सकाळपासून रात्रीपर्यंत असंच चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं.तर ही वाहतूक कोंडी काढण्याचा प्रयत्न केला तरीही पोलिसांची मात्र दमछाक होते.त्यामुळे आता या वाहतूक कोंडीवर प्रशासन किती गांभीर्यानं लक्ष घालतं हे पहावं लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: December 25, 2016, 7:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading