पवई हाऊस बोट दुर्घटनेत बेपत्ता तिघांचे मृतदेह सापडले

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Dec 24, 2016 10:39 PM IST

पवई हाऊस बोट दुर्घटनेत बेपत्ता तिघांचे मृतदेह सापडले

pawai lake24 डिसेंबर : पवई  तलावात  हाऊस बोट दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या तिघांचे मृतदेह सापडलेत. तिघांचेही मृत्यूदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

पवई तलावात शुक्रवारी रात्री आठ जण या हाऊसबोटवर दारू पार्टी करण्यासाठी गेले होते. मात्र अचानक बोट बुडायला लागल्याने त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा करायला सुरूवात केली. यात आठपैकी पाच जणांना वाचवण्यात यश आलं. तर तीन जण बेपत्ता झाले होते. अनेक तासांच्या शोधमोहिमेनंतर त्यांचे मृतदेह सापडलेत. पवई तलावात हाऊस बोट अनधिकृत रीत्या चालवत असल्याची तक्रार याआधीही स्थानिक नगरसेवक अविनाश सावंत यांनी केली होती. पण बड्या लोकांच्या हाऊसबोट पार्टीला नेहमीच बीएमसीच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी पाठीशी घातलं. परिणामी बेकायदेशीर चालनाऱ्या या हाऊसबोट पार्टीमध्ये मध्यरात्री ही दुर्घटना घडली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 24, 2016 10:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...