वडापाव गाडीवर कारवाई केली म्हणून अधिकाऱ्याला काळं फासलं

वडापाव गाडीवर कारवाई केली म्हणून अधिकाऱ्याला काळं फासलं

  • Share this:

kalyan423 डिसेंबर : शिव वडापाव गाडीवर कारवाई केल्यानं शिवसैनिकांनी मनपा अधिकाऱ्याच्या तोंडाला काळं फासलं. पोलिसांसमोर शिवसैनिकांनी अधिकारी अरूण वानखेडे यांना बेदम मारहाण केली. दरम्यान कल्याण डोंबिवली महापालिकेचे कर्मचाऱ्यांनी शिवसैनिकांना एका खोलीत कोंडून ठेवलं. आणि मनपा कर्मचाऱ्यांनी शिवसैनिक शामराव क्षीरसागर यांना मारहाण केल्याचा आरोपही शिवसैनिकांनी केलाय.

कल्याण स्टेशन परिसरात असणाऱ्या क्षिरसागर यांच्या शिव वडापावच्या गाडीवर काही दिवसांपूर्वी पालिकेने कारवाई केली होती. या कारवाई दरम्यान गाडीवर असणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या प्रतिमाही तोडण्यात आल्याचा आरोप श्याम क्षीरसागर यांनी केला. त्याच्या निषेधार्थ आपण ही प्रभाग अधिकाऱ्यांच्या अंगावर शाई फेकल्याचेही क्षीरसागर याने सांगितले. महापालिका मुख्यालयाबाहेर असणाऱ्या 'क' प्रभाग क्षेत्र कार्यालयात वानखेडे उपस्थित होते. गाडीवरील कारवाई केल्यासंदर्भात त्यांना निवेदन देण्यासाठी आल्याचे सांगून क्षीरसागर यांनी वानखेडे यांच्या कार्यालयात प्रवेश करीत वानखेडे यांच्या अंगावर शाईफेक केली.

अचानक झालेल्या या प्रकाराने अरुण वानखेडे यांच्यासह सर्वच जण हबकून गेले. तर या प्रकरानंतर तिथे असणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांनी क्षिरसागरला एका खोलीत डांबून मारहाण केल्याची माहितीही प्रत्यक्षदर्शीने दिली. दरम्यान याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी क्षीरसागरला पोलिसांनी ताब्यात घेतले असून बाजारपेठ पोलीस पुढील तपास करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 23, 2016 09:19 PM IST

ताज्या बातम्या