'त्या' 10 कोटी प्रकरणी 'मुंडे' भगिनींच्या अडचणीत वाढ, सीबीआयकडे पुरावे

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Dec 24, 2016 12:02 AM IST

'त्या' 10 कोटी प्रकरणी 'मुंडे' भगिनींच्या अडचणीत वाढ, सीबीआयकडे पुरावे

pankaja_And_pritam23 डिसेंबर : मुंबईत १० कोटीच्या नोटा बदलून त्या वैद्यनाथ बँकेच्या असल्याचं सांगणाऱ्या दोन अधिकाऱ्यांवर सीबीआयने अखेर गुन्हा दाखल केला आहे. तसंच सीबीआयच्या हाती महत्वाचे पुरावे लागले आहे. त्यामुळे महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे अडचणीत येण्याची शक्यता आहे.

15 डिसेंबरला मुंबईतील चेंबुर भागात एका खासगी कारमध्ये 10 कोटींची रोकड पकडण्यात आली होती. ही रोकड परळीच्या वैद्यनाथ सहकारी अर्बन बँकेच्या मुख्य शाखेतून घाटकोपरला आणण्यात आल्या असल्याचं या अधिकाऱ्यांनी पोलिसांना सांगितलं होतंय. त्यानंतर या प्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना सीबीआयने आज या अधिकाऱ्यांच्या घरासह पुणे,मुंबई आणि औरंगाबादमध्ये ११ ठिकाणी छापे टाकलेत आणि या छाप्यांमध्ये सीबीआय ने महत्वाचे पुरावे मिळाल्याचं सीबीआयच्या प्रसिद्धी पत्रकात सांगण्यात आलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 23, 2016 08:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...