ठाण्यात पातलीपाड्यात दरड कोसळून 2 मजूर ठार

ठाण्यात पातलीपाड्यात दरड कोसळून 2 मजूर ठार

  • Share this:

thane_23 डिसेंबर : ठाण्यातील घोडबंदर रोड पातलीपाडा इथं टीसीएस कंपनीच्या इमारतीचे काम सुरू होते. इमारतीच्या पाया खोदण्याचे काम सुरु होते. खोलवर खोदण्यात आलेल्या खड्ड्यातील मातीवर काढून बाजूलाच टाकण्यात आली होती.याच वेळेस ढिगारा कोसळून झालेल्या घटनेत ९ पैकी ७ कामगार किरकोळ जखमी झाले तर २ जाणंचा जागीच मृत्यू झाला. रात्री उशिरा पर्यंत ढिगारा उपासण्याचं काम सुरू होतं. अखेर शोधकाम थांबवण्यात आले आहे. या घटनेत ३३ वर्षीय अब्दुल हुसेन आणि ३१ वर्षीय राधाकांत बाराबोये या दोघांचा मृत्यू झालाय.

पातलीपाडा हिरानंदानी येथे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनीच्या इमारतीचे काम सुरू होते. खाडी किनारी असलेल्या या इमारतीच्या पाया खोदण्याचे काम सुरू असताना काम करणाऱ्या कामगारांच्या अंगावर मातीचा ढिगारा  कोसळला. त्यात  कामगार दाबले गेले.  अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथकाने ९ पैकी दोन मृतदेह बाहेर काढले . तर ७ कामगार किरकोळ जखमी झाले आहेत.

खाडी किनारी सुरू असलेल्या इमारतीचे काम हे त्यामुळे इमारतीच्या पाया खोदकामात चिकट माती पुन्हा पडल्याने हा अपघात घडला. सोबत या कामगारांना सुरक्षिततेची साधनाच्या अभावाने हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. एका कामगाराचा मृतदेह थेट रुग्णवाहिकेत नेला. त्याचा चेहरा पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली असता अखेर घटनास्थळी असलेल्या पोलिसांनी बघ्यांवर सौम्य लाठीचार्ज करावा लागला. या अपघाती घटनेला जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी देखील भेट दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: December 23, 2016, 5:40 PM IST

ताज्या बातम्या