असा होणार शिवस्मारकाचा जलपूजन सोहळा

असा होणार शिवस्मारकाचा जलपूजन सोहळा

  • Share this:

shivsmark322 डिसेंबर  : शिवस्मारकाच्या जलपूजनाच्या निमित्तानं भाजप शक्तिप्रदर्शन करणार आहे.  नोटाबंदीच्या सावटाखालील हा समारंभ शाही झगमगाटात होणार आहे. शिवसृष्टी आणि शिवकालीन प्रसंग साकारत भाजपकडून त्याचा राजकीय लाभ उठविला जाणार आहे. स्मारकाच्या वचनपूर्तीबरोबरच रेल्वे, मेट्रो आणि एमएमआरडीएच्या सुमारे एक लाख कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी करून दाखविले हा दावा भाजपकडून केला जात आहे. नोटाबंदीच्या झळा आणि मंदीचे वातावरण अजूनही तीव्र असताना आगामी महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याआधी स्मारकाचे जलपूजन आणि मुंबईतील विविध प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. मोदी यांचे मुंबईत आगमन झाल्यावर ते अरबी समुद्रातील नियोजित स्मारकाच्या जागी जातील. त्यासाठी तीन हॉवरक्राफ्ट सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

एका हॉवरक्राफ्टमध्ये पंतप्रधान मोदी आणि त्यांचा ताफा, दुसऱ्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल सी. विद्यासागर राव, उद्धव ठाकरे, दोन पंडित, खासदार उदयनराजे भोसले, संभाजीराजे असतील. तिसऱ्या हॉवरक्राफ्टमध्ये उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा समावेश राहील. नौदलाच्या युद्धनौका, तटरक्षक दलाच्या नौका अरबी समुद्रात दोन-चार दिवस गस्त घालणार आहेत. वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानात भूमिपूजनाचा मुख्य समारंभ होणार आहे.

जलपूजनासाठी जय्यत तयारी

- नरेंद्र मोदींचं आगमन झाल्यावर स्मारकाच्या जागी जाण्यासाठी तीन हॉवरक्रॉप्ट सज्ज

- एका हॉवरक्रॉफ्टमध्ये मोदी आणि त्यांचा ताफा

- दुसऱ्या हॉवरक्रॉफ्टमध्ये मुख्यमंत्री, राज्यपाल, उद्धव ठाकरे, दोन पुजारी, खासदार उदयनराजे भोसले, संभाजीराजे

- तिसऱ्या हॉवरक्रॉफ्टमध्ये उच्चपदस्थ अधिकारी

- नौदलाच्या युद्धनौका अरबी समुद्रात गस्तीला

- वांद्रे कुर्ला संकुलातल्या मैदानात भूमिपूजनाचा मुख्य  सोहळा

- नितीन देसाईंकडे व्यासपीठाच्या सजावटीचं काम

- शिवसृष्टी साकारली जाणार

- जलपूजन झाल्यावर मोदी येण्याच्या मार्गात हाजीअली, मरिन ड्राईव्ह अशा ठिकाणी शिवकालीन प्रसंग साकारले जाणार

- सरदार आणि मावळ्यांच्या वेशातले कलाकार त्यांचे स्वागत करतील

- पोवाडे सादर केले जातील

- प्रत्येक जिल्ह्यातून पवित्र नद्यांचे जल आणि किल्ल्यांची माती कलशात जमा केली जाईल

- सजवलेल्या रथातून 23 तारखेला हे कलश मुंबईला पोहोचतील

- मुख्यमंत्र्यांकडे हे कलश सोपवले जातील

- जलपूजनाच्या जागेत हे जल आणि माती अर्पण केली जाईल

- शिवराज्याभिषेकाच्या धर्तीवर तयारी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: December 22, 2016, 6:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading