वर्ध्यात 34 लाख जप्त, 2000 च्या नोटांचा समावेश

वर्ध्यात 34 लाख जप्त, 2000 च्या नोटांचा समावेश

  • Share this:

wardha33वर्धा, 21 डिसेंबर : दोन हजाराच्या नवीन नोटा घेऊन जाणाऱ्या एका व्यक्तीला वर्ध्यामध्ये हिंगणघाटमध्ये अटक करण्यात आलीये. त्याच्याकडन 34 लाख 42 हजार जप्त करण्यात आले आहे.गेल्या दोन दिवसातील ही दुसरी घटना आहे.

आज दुपारच्या सुमारास पोलिसांना या व्यक्तीविषयी माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे या वक्तीच्या मुसक्या आवळण्यात आल्या त्याच्याकडून 3४ लाख ४३ हजाराची रक्कम जप्त आलीये.  आज पकडण्यात आलेली रक्कम ही बहुतेककरून  2000 च्या नव्या नोटांमध्ये आहे. या माणसाच्या गाडीत असणाऱ्या बॅग मध्ये दोन हजाराच्या ३३ लाख ९२ हजार तर एक हजारच्या जुन्या ५० नोटा आणि शंभर जुन्या दहा नोटा असा एकूण ३४ लाख ४३ हजाराचा नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या नोटा आयकर विभागाकडे जमा करण्यात येणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 21, 2016 09:07 PM IST

ताज्या बातम्या