S M L

इंडियन सुपर लीगमध्ये अवतरलेले जगज्जेते फुटबॉलपटू

Sachin Salve | Updated On: Dec 21, 2016 06:52 PM IST

इंडियन सुपर लीगमध्ये अवतरलेले जगज्जेते फुटबॉलपटू

21 डिसेंबर : जगभरातील सर्वोत्कृष्ट फूटबॉल खेळाडू भारतात यावेत आणि त्यांच्या क्रीडा कौशल्याची झलक भारतीयांना बघायला मिळावी, हे एक उद्दिष्ट ‘इंडियन सुपर लीग’ सुरू करण्यामागचे होते. म्हणूनच आतापर्यंत पार पडलेल्या ३ हंगामांत आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाचे फुटबॉल खेळाडू सहभागी झाले होते. ‘फिफा’ विश्वचषकात खेळलेले आणि आता ‘इंडियन सुपर लीग’चा हिस्सा झालेले जगज्जेते खेळाडू पुढीलप्रमाणे आहेत –

१. अलेस्सान्द्रो डी पेरो – डी पेरो हा इटलीचा महान खेळाडू ‘दिल्ली डायनॅमस’च्या उद्घाटनपर हंगामात सहभागी झाला होता. २००६ साली डी पेरोने इटलीच्या संघासोबत विश्वविजेत्या पदावर शिक्कामोर्तब केले होते. जर्मनीच्या उपान्त्य फेरीत जर्मनीच्या विरोधात खेळताना त्याच्या कौशल्याची चुणूक दिसली होती. त्याने दुसरा गोल नोंदवून संघाला रोमहर्षक विजय मिळवून दिला.

२. रॉबर्ट पायर्स –  १९९८ साली ‘फिफा’चे विश्वविजेतेपद संपादन केलेल्या फ्रेंच संघात रॉबर्ट मधल्या फळीतील फिल्डर होता. पायर्स संघात होता, मात्र संघाचा नियमित सदस्य नव्हता. झिनेदिन झिदान आणि थेरी हेन्री यांच्यासोबत रॉबर्टही फ्रेंच टीमच्या केंद्रस्थानी असल्याने तोही फ्रेंच संघासोबत २००० साली पार पडलेलया युनियन ऑफ युरोपियन फुटबॉल असोसिएशनचे विजेतेपद पटकावण्यासाठी गेला होता. एफसी गोवा संघातर्फे खेळताना प्रारंभीच्या हंगामात रॉबर्टने आपल्या खेळाने साऱ्यांचे लक्ष वेधले होते.

 ३. डेव्हिड त्रेग्यु - हा उंचापुरा खेळाडू १९९८ सालच्या जगज्जेत्या संघाचा भाग होता. २००० साली झालेल्या युनियन ऑफ युरोपियन फुटबॉल असोसिएशनच्या अंतिम सामन्यात जेव्हा त्याने इटलीच्या विरोधात आपला सोनेरी गोल नोंदवला तो आंतरराष्ट्रीय स्तरावर नोंदवलेल्या डेव्हिडच्या आयुष्यातील कामगिरीचा गौरवशाली क्षण होता. ‘एफसी पुणे सिटी’ संघाच्या पहिल्या हंगामाच्या सामन्यात तो सहभागी झाला होता.

४. जोन कॅपडेव्हिला – हा स्पॅनिश संघातील बचावपटू नॉर्थईस्ट युनायटेड संघाच्या प्रारंभीच्या हंगामात सहभागी झाला होता. कार्ल्स प्युयो आणि सर्जी रॅमो या जोडगोळीइतका तो लोकप्रिय नसला तरी २०१०च्या स्पेनच्या ‘फिफा’ विश्वचषकाच्या विजयी मोहिमेतील प्रत्येक सामन्यात तो संघातर्फे खेळला होता. २००८ साली स्पॅनिश राष्ट्रीय संघासोबत त्याने ‘युनियन ऑफ युरोपियन फुटबॉल असोसिएशन’ सामन्यांचे विजेतेपदही पटकावले होते.

Loading...

 ५.   मार्को मॅटरझ्झी – २००६च्या ‘फिफा’च्या विश्वचषक सामन्यांदरम्यान हा उंचापुरा बचावपटू अनेक अर्थांनी इटलीचा सामनावीर होता. या सामन्यादरम्यान राखीव खेळाडू म्हणून सुरुवात केलेल्या मॅटरझ्झी याचा त्यांचा नेहमीचा बचावपटू अलेस्सान्द्रो निस्सा याच्या दुखापतीमुळे संघात समावेश करण्यात आला. फ्रान्सविरूद्धच्या अंतिम सामन्यात त्याने इटलीकरता महत्त्वाचे बरोबरी करणारे सर्व गुण संपादन केले. सामना सुरू असताना त्याची आणि झिदानची बाचाबाची झाल्यानंतर झिदानने त्याला डोक्याने जोरात धडक मारली होती, परिणामी, झिदानला मैदानाबाहेर जावे लागले होते. पेनाल्टीवर इटलीने विश्वविजेतेपद पटकावले. २०१४च्या हंगामासाठी हा इटलीचा खेळाडू चेन्नईयन संघाकरता प्रशिक्षकपद आणि खेळाडू म्हणून रूजू झाला. दुसऱ्या हंगामात विजेतेपद पटकावण्यासाठी त्याने संघाला मार्गदर्शन केले.

६.   रॉबर्टो कार्लो– हा खेळाडू त्याच्या अविस्मरणीय ‘फ्री किक्स’करता प्रसिद्ध आहे. २००२ सालच्या ‘फिफा’च्या पाचव्या विश्वचषकादरम्यान ब्राझीलने बजावलेल्या अद्वितीय कामगिरीत रॉबर्टो कार्लोच्या ‘फ्री किक्स’चा मोलाचा वाटा होता. दुसऱ्या हंगामात दिल्ली डायनॅमस संघात प्रशिक्षक आणि खेळाडू अशी दुहेरी जबाबदारी त्याने निभावली.

७.   ल्युसिओ – उंचापुऱ्या ब्राझिलचा हा बचावपटूही ‘फिफा’च्या २००२च्या विश्वविजेत्या संघाचा भाग होता, ज्यांनी आशियाई मातीत पहिल्यांदा विश्वचषक जिंकला होता. २०१५ साली गोव्याच्या संघासाठी त्याला करारबद्ध करण्यात आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 21, 2016 06:52 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close