सैफीनाच्या घरात छोट्या नवाबाचं आगमन

 सैफीनाच्या घरात छोट्या नवाबाचं आगमन

  • Share this:

C0EfLvTWEAAMDdz

20 डिसेंबर :  अभिनेत्री करिना कपूरच्या घरी छोट्या नवाबाचं आगमन झालं आहे. करिना कपूरने मुंबईतील ब्रीच कॅण्डी रूग्णालयात मुलाला जन्म दिला आहे. करिना आणि बाळ दोघेही सुखरुप आहे.

दरम्यान, तैमूर अली खान पतौडी असं सैफ आणि करीनाच्या बाळाचं नामकरण करण्यात आलं आहे. सैफ आणि करिनाच्या वतीने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात त्यांनी बाळाच्या जन्माची आणि त्याच्या नावाची माहिती दिली.

20 डिसेंबरला करिनाला बाळ होणार असल्याची माहिती कपूर कुटुंबियांकडून देण्यात आली होती. हे भाकित अगदी खरं ठरलं आणि आज सकाळी 7.30 वाजता करिनाने मुलाना जन्म दिला.

सध्या सैफिनावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. करिनाचा अगदी जवळचा मित्र, दिग्दर्शक करण जोहरनेही बेबोला शुभेच्छा देत, छोट्या नवाबाचं नाव तैमुर अली खान असल्याची सर्व प्रथम जाहीर केलं.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच करिनाचे वडील रणधीर कपूर यांनी तिच्या तब्येतीबाबत माहिती दिली होती. ती आणि बाळ दोघांचे आरोग्य चांगलं असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.

तैमूर हेच नाव का?

तैमूर हे मुघल राजाचं नाव असून त्यानं खान हे नाव कधीच वापरलं नाही. खरं तर त्याचं नाव तिमूर असं आहे. खान हे नाव लावलं नाही कारण तो चंगीज खानच्या कुटुंबातून येत नव्हता. तैमूर हा एका टोळीचा राजा होता नंतर मात्र त्यानं चंगीज खानच्या वंशजांचा पराभव करत सत्ता मिळवली. स्वत:च्या सत्तेचा विस्तार करण्यासाठी तैमूरनं मात्र चंगीझ खानच्या कुटुंबात असलेल्या महिलांशी लग्न केलं आणि स्वत:च्या नावाचं राजघरानं सुरु केलं. तैमूर हा धाडसी आणि कर्तृत्ववान राजा होता. त्याची सत्ता पश्चिम, मध्य आणि दक्षिण आशिया, आफ्रिका आणि युरोपच्याही काही भागात पसरली होती. सत्ता मिळवताना त्याच्या सैन्याकडून 1 कोटी 70 लाख जण मारले गेल्याचा इतिहास आहे. तत्कालीन लोकसंख्येच्या ही संख्या पाच टक्के होती. तैमूर हा बाबरचा खापर खापर खापर पंजोबा आहे. तैमूरनं खान नाव जरी वापरलं नसलं तरी सत्ता विस्तार करताना तो चंगीज खानचं नाव वापरत राहीला. इस्लामची भाषा, त्यातल्या प्रतिकांनाही त्यानं महत्व आणलं. शैक्षणिक तसंच धार्मिक संस्थांनाही तैमूरनं राजाश्रय दिला. तैमूरच्यानंतर मात्र त्याचं साम्राज्य फार काळ टिकलं नाही. पण पुढं त्याच्या वंशजांनी मुघल साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि त्यात बाबर, अकबर, औरंगजेब असे मोठं साम्राज्य निर्माण करणारे राजे निर्माण झाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: December 20, 2016, 11:13 AM IST

ताज्या बातम्या