गडचिरोलीत कमळ उमललं, नगरपरिषदेवर भाजपचा झेंडा

गडचिरोलीत कमळ उमललं, नगरपरिषदेवर भाजपचा झेंडा

  • Share this:

bjp-pradarshan19 डिसेंबर : नगरपरिषदा निवडणुकीच्या दोन्ही टप्प्यात भाजपने बाजी मारलीये. भाजपची घोडदाैड तिसऱ्या टप्प्यातही कायम असून नक्षलग्रस्त गडचिरोलीमध्ये कमळ उमललं आहे. गडचिरोली नगरपरिषदेत 18 जागा जिंकत भाजप मोठा पक्ष ठरलाय.

गडचिरोली नगरपरिषदेच्या राजकारणात गेली अनेक वर्षे या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता कायम राहिली आहे. मात्र, गेल्या नगरपरिषदेत काँग्रेसचा पराभव करुन युवाशक्ती संघटनेची सत्ता आली. गेल्या पाच वर्षात युवाशक्ती संघटनेच्या माध्यमातून निवडून आलेले पदाधिका-यांनी वेगवेगळया पक्षात प्रवेश केल्याने आता विकासकामे आणि शहराचा रखडलेला विकास या मुद्दयावर ही निवडणूक लढवली गेली.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी तर शिवसेनेने तीन मंञ्यांच्या सभा घेऊन प्रचारात रंग आणण्याचा प्रयत्न  केला. भाजपकडून मुख्यमंञी देवेंद्र फडणवीसही प्रचार सभा घेऊन धुराळा उडवला. ही निवडणूक गडचिरोलीचे भाजपचे खासदारांसह आमदार देवराव होळी यांच्यासाठी प्रतिष्ठेची केली होती. मात्र, गडचिरोलीच्या जनतेनं यावेळी भाजपला साथ देत आपले मत पारड्यात पाडली. गडचिरोली नगरपरिषदेच्या एकूण 25 जागेपैकी  22 जागांचा निकाल जाहीर झाला असून भाजपने 18 जागा जिंकल्या आहे. तर अपक्ष 3 आणि काँग्रेसला एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. भाजपच्या नगराध्यक्षपदाच्याउमेदवार योगिता पिंपरे आघाडीवर आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: December 19, 2016, 1:52 PM IST

ताज्या बातम्या