अशोक चव्हाणांनी गड राखला

अशोक चव्हाणांनी गड राखला

  • Share this:

asokh_chavan_win19 डिसेंबर : तिसऱ्या टप्प्यात काँग्रेसने दमदार आघाडी घेतलीये. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी अपेक्षेप्रमाणे आपला गड कायम राखलाय. अर्धापूर  नगरपंचायतीवर काँग्रेसचा झेंडा फडकलाय. मुखेडमध्ये नगराध्यक्षपद आणि बिलोली नगरमध्ये काँग्रेसने एकहाती सत्ता राखली आहे.

नांदेड म्हणजे अशोक चव्हाण...हे समिकरण पुन्हा एकदा सिद्ध झालंय.  धर्माबाद,  उमरी, हदगाव, मुखेड,  बिलोली,  कंधार, कुंडलवाडी,  मुदखेड,  देगलूर नगरपरिषदा आणि अर्धापूर  आणि माहूर नगर पंचायतीसाठी मजमोजणी सुरू आहे.  अर्धापूर नगर पंचायत काँग्रेसच्या ताब्यात गेली असून अशोक चव्हाणांनी गड कायम राखला आहे. इथं काँग्रेसने 10 राष्ट्रवादीने 4, तर  एमआयएमने 2 आणि अपक्षने 1 जागा जिंकलीये.

मुखेडमध्ये भाजप-सेना आघाडीने 12 जागांवर तर  काँग्रेस - रासप आघाडीने 4 जागांवर आघाडीवर आहे. मात्र, अध्यक्षपद काँग्रेसकडे गेलंय.  तर बिलोली नगर परिषदेही काँग्रेसला बहुमत मिळाले आहे. एकूण 17 जागांपैकी 12 जागांवर काँग्रेस विजयी झालंय. तर लोकभारतीला 4 जागा आणि अपक्षाला 1 जागा मिळालीये.

तर उमरी नगर परिषदेवर राष्ट्रवादीची सत्ता कायम आहे. राष्ट्रवादीने 17 पैकी 17 जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता राखली आहे. तर दुसरीकडे मुदखेडमध्ये अशोक चव्हाणांना गड आला पण सिंह गेला अशी अवस्था झाल्याची परिस्थिती आहे. काँग्रेसचे सर्वाधिक 10 जागा पटकावल्या आहे पण नगराध्यक्षपद अपक्षाकडे गेलंय. सद्धा या ठिकाणी फेरमतमोजणी सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: December 19, 2016, 1:29 PM IST

ताज्या बातम्या