तिसऱ्या टप्प्यात दिग्गजांची प्रतिष्ठापणाला

तिसऱ्या टप्प्यात दिग्गजांची प्रतिष्ठापणाला

  • Share this:

Nagar parishad banner1

19 डिसेंबर : राज्यातील तिसऱ्या टप्प्यातील नगरपालिकांच्या निवडणुकांचा आज निकाल लागणार आहे. सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. नांदेडमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, औरंगाबादमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे तर भंडारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

नांदेड जिल्ह्यातील 9 नगरपालिका आणि 2 नगरपंचायती, औरंगाबादमधील 4, भंडारा जिल्ह्यातील 4 आणि गडचिरोली जिल्ह्यातील 2 नगरपालिकांचा समावेश आहे.

पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर पक्षांच्या तुलनेत अधिक जागा आल्या. आता तिसऱ्या टप्प्यात कोण बाजी मारणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्यात आज चार नगरपालिकांची मतमोजणी  होणार आहे.

- पैठण नगरपालिका

- कन्नड नगरपालिका

- खुलताबाद नगरपालिका

- गंगापूर नगरपालिका

नांदेड : नांदेड जिल्ह्यात 9 नगरपालिका आणि 2 नगरपंचायतींची मतमोजणी  होणार आहे.

- हदगाव नगरपालिका

- कंधार नगरपालिका

- धर्माबाद नगरपालिका

- बिलोली नगरपालिका

- देगलूर नगरपालिका

- मुखेड नगरपालिका

- उमरी नगरपालिका

- कुंडलवाडी नगरपालिका

- मुदखेड नगरपालिका

- माहूर नगरपंचायत

- अर्धापूर नगरपंचायत

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील दोन नगरपालिकांची मतमोजणी  होणार आहे.

- गडचिरोली नगरपालिका

- देसाईगंज नगरपालिका

भंडारा : भंडारा जिल्ह्यातील चार नगरपालिकांची मतमोजणी  होणार आहे.

- भंडारा

- तुमसर

- पवनी

- साकोली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: December 19, 2016, 9:00 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading