मोरारजी,वाजपेयींच्या काळात नोटबंदी का केली नाही ? -शरद पवार

मोरारजी,वाजपेयींच्या काळात नोटबंदी का केली नाही ? -शरद पवार

  • Share this:

sharad_pawar_modi17 डिसेंबर : तुम्ही इंदिरा गांधींना आज दोष देताय पण मोरारजी, अटलबिहारींच्या काळात तुमचेच सरकार होते. मग तेव्हा नोटबंदीचा निर्णय का घेतला नाही असा सवाल करत स्वत :चं काैतुक करून घ्यावं पण इतरांना दोष देऊ नका असा सणसणीत टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला. तसंच संसद भवन कोसळल्याच्या भीतीमुळे आम्ही परेशान झालो होतो. पण आता असं काही होत नसल्यामुळे आम्हाला शांत झोप लागले असा टोलाही शरद पवारांनी राहुल गांधींचं नाव न घेता लगावला.

मुंबईत राष्ट्रवादी भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी नोटबंदीच्या मुद्द्यावर आज पुन्हा एकदा शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. अाॅपरेशन केलं पण व्यवस्था केली नाही. नोटबंदीमुळे आज सर्वात जास्त हाल शेतकऱ्यांचे झाले आहे. त्यामुळे नोटबंदी करायची होती तर आधी पर्यायी व्यवस्था निर्माण करायला पाहिजे होती असं परखड मत शरद पवारांनी व्यक्त केलं.

'वाजपेयींच्या काळात का निर्णय घेतला नाही'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल इंदिरा गांधी यांनी नोटबंदीचा निर्णय घेतला नाही पण आम्ही तो घेतला असं जाहीरपणे सांगितलं. त्यांच्या या विधानाचा समाचार घेत शरद पवारांनी मोदींची चांगलीच कानउघडणी केली. हा निर्णय मी घेतला आणि हे धाडस कुणीचं दाखवलं नाही असं सांगतं 1971 साली इंदिरा गांधींच्या काळात त्यावेळचे अर्थमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी नोटाबंदीचा निर्णय घेतला नाही असं काही तरी नरेंद्र मोदींच्या वाचनात आलं. त्यावरुन त्यांनी इंदिरा गांधींनी तेव्हा करुन दाखवलं नाही ते आज मी केलं असं काही ते भासवतं आहे. चांगली गोष्ट आहे तुम्ही धाडसी आहात. पण प्रश्न असा आहे की, इंदिरा गांधी गेल्यानंतर मोराजी देसाईंचं राज्य आलं होतं. त्यामध्ये जनसुराज्य होतं, अडवाणी होते. त्याकाळी का निर्णय घेतला नाही ?, 13 महिने अटलबिहारी वाजपेयींकडे राज्य होतं. त्यानंतर पुन्हा 5 वर्ष सत्ता अटल बिहारी वाजपेयींकडे होती. तेव्हा भाजपचे यशवंत सिन्हा अर्थमंत्री होते. त्यावेळी नोटबंदीचा निर्णय का घेतला नाही ? असा सवाल करत शरद पवारांची उजाळणी करुन दिली.

तसंच आता तुम्ही इंदिरा गांधींना दोष द्याला निघालाय. पण, तुमच्या हाती सत्ता होता तेव्हा निर्णय घेतला नाही. बरं आता निर्णय घेतला तर त्यांचं कौतुक करून घेताय निदान दुसऱ्यांवर टीका तरी करू नका असा सल्लावजा टोलाही पवारांनी लगावला.

'भूकंप टळल्यामुळे आम्हाला शांत झोप लागते'

मोदींच्या विरोधात माझाकडे पुरावे असून बोललो तर भूकंप होईल असं विधान करणारे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याही शरद पवारांची खरपूस समाचार घेतला. शरद पवार म्हणता,"मी भयंकर काळजीत होतो संसद भवन कोसळतं की काय...आम्ही चिंतेत पडलो होतो जर संसद भवन कोसळलं तर आमचं काय व्हायचं...बरं झालं त्यांनी आधीच सांगितलं. पण आता काही भूकंप होत नसल्यामुळे आम्हाला शांत झोप यायला लागलीये"

'मोदींच्या काळात सर्वात जास्त हल्ले'

देशाच्या सुरक्षेची मला काळजी वाटते.  मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी म्हणायचे की, पाकिस्तानला प्रेमपत्र का पाठवता. एकदाच काय तो बंदोबस्त करा.  पण आता मोदी यांच्या कार्यकाऴात सर्वात जास्त हल्ले झाले आहे.  गेल्या वर्षभरात आपले 57 जवान आणि अधिकारी शहीद झाले आहे.  भारतीय सीमा असुरक्षित वाटत आहे असंही पवार म्हणाले.

2000 च्या नोटा कुठून आल्यात?

नगरपरिषदा आणि नगरपालिका निवडणुकीत भाजपला मिळालेल हे तात्कालिक यश आहे. त्यामुळे त्यांनी भुरळून जाऊ नये असंही शरद पवार म्हणाले. तसंच गेल्य़ा काही दिवसांमध्ये जे छापे पडत आहेत, त्यामध्ये सर्व सर्व नवीन 2000 च्या नोटा सापडत आहेत.एकीकडे लोकांना नोटा मिळत नाही. पण काही धनदांड्यांकडे नव्या नोटा कशा येत आहे.  ही गंभीर गोष्ट आहे, नेमके हे पैसे कुठुन येतात याची चौकशी केली पाहिजे अशी मागणीही पवारांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: December 17, 2016, 6:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading