आता दिवावासियांची सुसाट स्वारी, उद्यापासून फास्ट लोकल थांबणार !

आता दिवावासियांची सुसाट स्वारी, उद्यापासून फास्ट लोकल थांबणार !

  • Share this:

 diva44417 डिसेंबर : मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ऐन तोंडावर आली असताना विविध सेवासुविधांच्या उद‍्घाटनांचा बार उडवायला सुरूवात झालीये.  मध्य रेल्वेवरील दिवा स्टेशनवर फास्ट लोकलना थांब्याची सुविधा उद्यापासून कार्यान्वित होणार आहे.

या नव्या सुविधेत अप आणि डाऊन मार्गावरील २४ गाड्यांना थांबा देण्यात येणार आहे. त्यामुळे दिवावासियांना गर्दीच्या वेळेत प्रवास करताना मोठा दिलासा मिळेल.  मध्य रेल्वेवरील दिवा स्टेशनवर आतापर्यंत फास्ट लोकलना थांबा देण्यात येत नव्हता. त्यामुळे कुंचबणा होणाऱ्या दिवावासियांनी जानेवारी महिन्यात आंदोलन केले होतं. त्याची दखल घेत रेल्वेने या ठिकाणी फास्ट लोकलना थांबा देण्यासाठी काम हाती घेतलं.  मुंबई रेल्वे विकास महामंडळाने काम युद्धपातळीवर हे पूर्ण केलंय. त्यामुळे दिवावासियांचा मुंबईपर्यंत सुसाट प्रवास करण्याचा मार्ग अखेर मोकळा झालाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: December 17, 2016, 2:38 PM IST

ताज्या बातम्या